Retired Cricketers List 2022 : 2022 हे वर्ष आता संपत आलं असून अवघे काही दिवस शिल्लक आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षातही अनेक क्रिकेटपटूंनी (Retired Cricketers) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. या काळात काही जणांनी निवृत्तीचे वय गाठले होते तर काहीनी अचानक क्रिकेटला अलविदा केला. काही क्रिकेटपटूंच्या निवृत्तीच्या निर्णयाने तर संपूर्ण क्रिकेट जगतासह चाहत्यांनाही आश्चर्य वाटले. तर या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंमध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे यापूर्वी विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य देखील होते. या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या काही मोठ्या क्रिकेटर्सबद्दल जाणून घेऊया...


तर या क्रिकेटर्समधील एक मोठं नाव म्हणजे इयॉन मॉर्गन... इंग्लंडचा विश्वचषक विजेता कर्णधार इयॉन मॉर्गनच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विश्वचषक जिंकल्यानंतर पुढील विश्वचषकापूर्वी निवृत्ती जाहीर करणारा तो जगातील पहिला कर्णधार आहे. विश्वचषकानंतर त्याला एकही मोठी खेळी खेळता आली नव्हती हे देखील तितकेच खरं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2019 मध्ये प्रथमच एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला.


या दिग्गजांनी देखील घेतली निवृत्ती


वेस्ट इंडिजचा मर्यादित षटकांचा कर्णधार कायरन पोलार्डनेही क्रिकेटला अलविदा केला. एका षटकात सहा षटकार मारण्याचा विक्रमही पोलार्डच्या नावावर आहे. त्यांच्याशिवाय विंडीज संघाचे दिनेश रामदिन आणि लेंडल सिमन्स, दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिस, श्रीलंकेचा सुरंगा लकमल, न्यूझीलंडचा हमिस बेनेट, भारताचा रॉबिन उथप्पा यांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या सर्व क्रिकेटपटूंशिवाय इंग्लंडचा सध्याचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून आणि श्रीलंकेचा गुणथिलका याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.






हे देखील वाचा-