South Africa vs India 1st T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना डर्बनमधील किंग्समीड मैदानावर खेळवला जात आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची युवा ब्रिगेड या मालिकेत खेळत आहे. डर्बनचे मैदान भारतीय संघाच्या अनेक ऐतिहासिक विजयांचे साक्षीदार आहे. अशा स्थितीत कर्णधार सूर्या पहिल्या टी-20 मध्येही हा अतुलनीय विक्रम कायम ठेवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकली असती तर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता, असे भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले.






दोन्ही संघांचे प्लेइंग-11


भारत : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, आवेश खान, वरुण चक्रवर्ती.


दक्षिण आफ्रिका : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅन्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, नाकाबायोमझी पीटर.


डर्बनच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेची कामगिरी खुपच खराब राहिला आहे. यजमान संघाने या मैदानावर आतापर्यंत एकूण 11 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 5 जिंकले आहेत, तर 6 सामने गमावले आहेत. दक्षिण आफ्रिकेसाठी चिंतेची बाब म्हणजे किंग्समीड येथे खेळल्या गेलेल्या मागील चार सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.


भारतीय संघासाठी डर्बनचे मैदान संस्मरणीय राहिले आहे. या मैदानावर झालेल्या पाच सामन्यांपैकी टीम इंडियाने चारमध्ये विजयाची चव चाखली आहे. 2007 साली याच मैदानावर युवराज सिंगने सहा चेंडूत सहा षटकार ठोकले होते. त्याचवेळी भारताने पाकिस्तानविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात बाजी मारली होती. कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवचा हा पहिलाच विदेश दौरा आहे, त्यामुळे सूर्याला युवा ब्रिगेडसोबत दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर दमदार कामगिरी करायला आवडेल.


हे ही वाचा -


KL Rahul Athiya Shetty News : KL राहुल होणार बाबा! पत्नी अथिया शेट्टी 2025 मध्ये देणार गोंडस बाळाला जन्म


Ind vs Aus Test Series : आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास! रोहितच्या अनुपस्थितीत कॅप्टन कोण? सलामीचे दोन्ही पर्याय फ्लॉप