Australia A vs India A 2nd Unofficial Test : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात मेलबर्नमध्ये दुसरी अनधिकृत कसोटी खेळली जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पंचांच्या एका निर्णयाने वाद निर्माण झाला. खरं तर, भारतीय स्पिनर तनुष कोटियनच्या षटकात एक विचित्र घटना पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्कस हॅरिस आऊट असतानाही मैदानी पंचांनी त्याला नाबाद दिले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


कॅचबाबत वाद का झाला?


मेलबर्न येथे सुरू असलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया अ संघाचा फलंदाज मार्कस हॅरिस 48 धावा करून फलंदाजी करत होता. त्यानंतर ऑफस्पिनर तनुष कोटियन गोलंदाजीसाठी आला. ऑस्ट्रेलियन फलंदाजाला त्याचा चेंडू अजिबात समजू शकला नाही आणि चेंडू त्याच्या बॅटला लागला आणि पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाकडे गेला, ज्याने अतिशय चांगल्या प्रकारे झेल पूर्ण केला. यावर भारतीय खेळाडूंनी जोरदार अपील केली. खेळाडू ओरडत राहिले पण पंच शांतपणे उभे होते. कोटियनने हाताने हावभाव करून दाखवण्याचा प्रयत्न केला की चेंडू बॅटला लागला. असे असतानाही या अपलीकडे दुर्लक्ष करण्यात आले. या निर्णयामुळे सर्व खेळाडू आश्चर्यचकित झाले.






समालोचकांनीही आश्चर्य व्यक्त केले आणि सांगितले की, प्रथमदर्शनी चेंडू बॅटला स्पर्श करत असल्याचे दिसत होते. मात्र, त्यानंतर सोशल मीडियावर यांची चर्चा रंगली. अंपायरचे डोळे फुटले का असे काही चाहते म्हणत आहे. या अपीलनंतर हॅरिसने आणखी 26 धावा जोडल्या आणि 74 धावा करून बाद झाला. भारत अ संघाने पहिल्या डावात 161 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया अ संघाने 223 धावा केल्या आणि 62 धावांची आघाडी घेतली.


पहिल्या सामन्यातही झाला होता वाद 


मॅके येथील पहिल्या सामन्यादरम्यान फील्ड अंपायर शॉन क्रेग यांनी भारत अ संघावर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला होता. यानंतर चेंडूवर स्क्रॅच मार्क्स दिसल्यानंतर त्याने तो बदलण्याचा निर्णय घेतला. यावरून पंच आणि भारतीय खेळाडूंमध्ये मैदानावर जोरदार वादावादीही झाला. भारत अ संघाचा यष्टीरक्षक इशान किशन चेंडू बदलण्याच्या निर्णयावर संतापला आणि त्याला विरोध केला.  


हे ही वाचा -


BCCIने घेतला मोठा निर्णय! पाकिस्तानला बसला '440 व्होल्टचा करंट', टीम इंडिया येथे खेळणार चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने?