Women Asia Cup 2022: भारतीय महिला संघ आज आशिया चषकातील त्यांचा दुसरा सामना मलेशियाशी (India Women vs Malaysia Women) खेळणार आहे. भारतानं सहा वेळा चॅम्पियन ठरलेल्या श्रीलंकेच्या संघाचा पराभव करत या स्पर्धेची विजयानं सुरुवात केली. श्रीलंकाविरुद्ध सामन्यात भारताची स्टार ऑलराऊंडर जेमिमा रोड्रिग्सनं (Jemimah Rodrigues) महत्वाची भूमिका बजवली. जेमिमीच्या 76 धावांच्या जोरावर भारतानं श्रीलंकेसमोर 150 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 109 धावांवर ढेर झाला. भारतानं हा सामना 41 धावांनी जिंकला. या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि शेफाली वर्माला (Shafali Verma) काही खास कामगिरी करता आली नाही. मलेशियाविरुद्ध आज खेळल्या जाणाऱ्या टी-20 सामन्यात स्मृती मानधना आणि शेफाली वर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा केली जात आहे.


कधी, कुठं पाहणार सामना?
भारतीय महिला आणि मलेशिया महिला यांच्यातील सामना आज सिलहट बाहरी क्रिकेट स्टेडियमवर (Sylhet Outer Cricket Stadium) खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी एक वाजता सामन्याला सुरुवात होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. भारतीय महिला आणि मलेशिया महिला यांच्यातील  लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. भारत आणि मलेशिया यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार पाहता येणार आहे. याशिवाय महिला आशिया चषकाच्या संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी https://marathi.abplive.com वर भेट देऊ शकतात.


संघ-


भारतीय महिला संघ:
शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दयालन हेमलता, रिचा घोष (विकेटकिपर), पूजा वस्त्राकर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, राधा यादव, रेणुका सिंह, सभिनेनी मेघना, मेघना सिंह, किरण नवगिरे, राजेश्वरी गायकवाड. 


मलेशिया महिला संघ: 
विनिफ्रेड दुराईसिंगम (कर्णधार), वान ज्युलिया (विकेटकिपर), मास एलिसा, एल्सा हंटर, माहिराह इज्जती इस्माईल, आइन्ना हमिझाह हाशिम, जमाहिदया इंतान, नूर एरियाना नटस्या, साशा आझमी, ऐसिया एलिसा, नूर दानिया स्युहादा, नुरिल्या नतास्या नूर हयाती झकेरिया, आयना नजवा, धनुश्री मुहूण


हे देखील वाचा-