Ruled Out Of ICC Champions Trophy 2025 Nortje Ruled : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज अँरिक नोर्किया दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर आहे. गेल्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपनंतर नोर्किया आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नव्हता. अलिकडेच त्याला दक्षिण आफ्रिकेच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात स्थान देण्यात आले. पण तो खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता, ज्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघातून बाहेर गेला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने बुधवारी ही माहिती दिली. चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि युएईमध्ये खेळवली जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्ड, सीएसएने या संदर्भात एक निवेदन जारी केले आणि म्हटले आहे की, "SATF20 मध्ये प्रिटोरिया कॅपिटल्सकडून खेळणारा अँरिक नोर्कियाला सध्याच्या टी20 लीग आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधून वगळण्यात आले आहे. 31 वर्षीय नोर्कियाची निवड करण्यात आली आहे." चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेसाठी त्याला संघात स्थान मिळाले, परंतु सोमवारी संध्याकाळी त्याची तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये त्याची दुखापत अपेक्षेपेक्षा जास्त गंभीर असल्याचे आढळून आले. तो वेळेत तंदुरुस्त होऊ शकणार नाही."
चॅम्पियन्स ट्रॉफी 50 षटकांच्या स्वरूपात खेळवली जाणार आहे, दरम्यान, हे लक्षात घेण्यासारखे आहे की त्यांनी सप्टेंबर 2023 पासून एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. त्यावेळी त्याच्या पायाला दुखापत झाली होती. तो 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप खेळला, पण त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला भारताकडून पराभव पत्करावा लागला. गेल्या 6 आयसीसी स्पर्धांमध्ये ही तिसरी वेळ आहे जेव्हा नोर्कियाला दुखापतीमुळे बाहेर बसावे लागणार आहे.
क्रिकेट साउथ आफ्रिकेने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'संघाचा वेगवान गोलंदाज अँरिच नोर्किया पाठीच्या दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून बाहेर पडला आहे.' त्याच्या जागी संघात आणखी एका खेळाडूची निवड करण्यात आली आहे. ज्यांची घोषणा नंतर केली जाईल.
आतापर्यंत त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 22 सामने खेळले आहेत आणि 36 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 19 कसोटी सामन्यांमध्ये 70 आणि 42 टी-20 सामन्यांमध्ये 53 विकेट्स घेतल्या आहेत.
गेल्या एका वर्षापासून दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या सगळ्या प्लॅटफॉर्म मध्ये चांगली कामगिरी करत आहे. गेल्या वर्षी आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत त्यांनी प्रवेश केला होता. या वर्षी जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीतही आफ्रिकन संघाने स्थान मिळवले आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही जेतेपदाचा दावेदार मानले जात आहे.
हे ही वाचा -