Jhulan Goswami Retirement: भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) आज इंग्लंडविरुद्ध तिच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळणार आहे. दोन दशकं भारतीय महिला संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या झुलन गोस्वामीनं जागतिक क्रिकेटमध्ये अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. इंग्लंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिका तिच्या कारकिर्दीतील अखेरची मालिका असेल, असं तिनं काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं.  भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना आज लॉर्ड्स येथे खेळला जाणार आहे

लॉर्ड्स येथे खेळवल्या जाणाऱ्या अखेरचा एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वा. खेळला जाईल. या सामन्यात झुलन गोस्वामी अखेरचं भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे. या सामन्याला काहीच तास शिल्लक असताना बीसीसीआयनं झुलन गोस्वामीचा एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यात झुलन गोस्वामीनं "भारतीय संघाची जर्सी घालून देशाचं राष्ट्रगीत गाणं, हे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण राहतील", असं म्हटलंय.

बीसीसीआयचं ट्वीट-

 


झुलन गोस्वामीची कारकिर्द
झुलन गोस्वामीनं आतापर्यंत 12 कसोटी, 203 एकदिवसीय आणि 68 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. तिनं कसोटीत 44, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 253 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 56 विकेट्स घेतल्या आहेत. महत्वाचं म्हणजे, ती एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 पेक्षा अधिक धावा आणि 200 पेक्षा अधिक विकेट्स घेणारी एकमेव खेळाडू आहे.

 

क्रिकेट सामने विकेट्स
कसोटी 12 44
एकदिवसीय 203 253
टी-20 क्रिकेट 68 56

हे देखील वाचा-