On This Day in 2007: ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यात आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (India vs Pakistan) होणार आहे. दरम्यान, आजच्या दिवशी 15 वर्षांपूर्वी भारतानं पाकिस्तानचा पराभव करून टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात अनेक युवा खेळाडूंनी पहिलावहिला टी-20 विश्वचषक जिंकला.
गौतम गंभीर भारताच्या विजयाचा शिल्पकार
दरम्यान, 2007 मध्ये खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी केली होती. या सामन्यात भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं 75 धावा केल्या. एका बाजूनं विकेट्स पडत असताना गंभीरनं दुसरी बाजू संभाळून ठेवली. गौतम गंभीरसह युसूफ पठाण (15 धावा), रॉबिन उथप्पा (14 धावा), महेंद्रसिंह धोनी 6 आणि रोहित शर्मा 30 धावांचं योगदान दिलं. या सामन्यात भारतानं 20 षटकात 157 धावा केल्या.
भारताची भेदक गोलंदाजी
दरम्यान, 158 धावांचं लक्ष्य रोखण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्या षटकात मोहम्मद हाफीज (1 धाव) आऊट झाला. त्यानंतर उमरान अकमलही शून्यावर बाद झाला. त्यानंतर इमरान नजीर (33 धावा) आणि युनिस खाननं (24 धावा) पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रतयत्न केला. त्यानंतर मिसबाह-उल-हकनं पाकिस्तानच्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवलं.
धोनीचा आश्चर्यचकीत करणारा निर्णय
या सामन्यातील अखेरच्या षटकात पाकिस्तानच्या संघाला विजयासाठी 13 धावांची आवश्यकता असताना धोनीनं जोगिंदर शर्माच्या हातात चेंडू सोपवला. धोनीचा हा निर्णय मैदानात असलेल्या प्रत्येकासाठी आश्चर्यचकीत करणार होता. परंतु, जोगिंदर शर्माच्या तिसऱ्या चेंडूवर मिसबाहनं स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु, श्रीकांतनं झेल पकडत भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.
2007 च्या टी-20 विश्वचषकात भारताचा प्रवास
2007 च्या टी-20 विश्वचषकात भारताचा पहिला सामना स्कॉटलँडशी होणार होता. पण हा सामना रद्द झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमने-सामने आले. या बॉलआऊट सामन्यात भारतानं 3-0 असा विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून 10 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानतंर इंग्लंडविरुद्ध भारतानं 18 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहनं एका षटकात सहा चेंडू मारण्याचा पराक्रम केला होता. भारतानं अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत उपांत्यफेरीत धडक दिली. जिथे त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला. या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 15 धावांनी पराभव करत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. त्यानंतर अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पाच धावांनी पराभव करत टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं.
हे देखील वाचा-