IND vs ENG, Shubman Gill Century : इंग्लंडविरोधात धर्मशाला कसोटीमध्ये युवा शुभमन गिल यानं धडाकेबाज शतक ठोकलं. कर्णधार रोहित शर्मा यानं आधी शतक ठोकलं, त्यानंतर पुढील काही क्षणात शुभमन गिल यानेही शतक ठोकले. एकप्रकारे शुभमन गिल यानं शतक ठोकत वडिलांना सलामीच दिली. शुभमन गिल याच्या शतकावेळी स्टेडियममध्ये वडील लखवींदर सिंह ( Lakhwinder Singh) उपस्थित होते. मुलाच्या शतकी खेळीनं लखवींदर सिंह भारावून गेले, त्यांनी उभं राहून टाळ्या वाजवत दाद दिली.  शुभमन गिल यांच्या वडिलांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.






शुभमन गिल याचं शतक - 


शुभमन गिल यानं राजकोट कसोटी सामन्यात शानदार शतक ठोकले. शुभमन गिल यानं 142 चेंडूमध्ये शानदार शतक ठोकले. शुभमन गिल यानं 5 षटकार आणि 10 चौकार लगावत शतकाला साज घातला. यशस्वी जायस्वाल माघारी परतल्यानंतर शुभमन गिल यानं रोहित शर्माची चांगली साथ दिली.  शुभमन दिल आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये आतापर्यंत दीड शतकी भागिदारी झाली. 


शुभमन गिल यानं इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेतील पहिलं शतकं ठोकलं. त्याचं हे आंतरराष्ट्रीय कसोटी करियरमधील चौथं शतक होय. शुभमन गिल याच्या शतकाचं सर्वच स्तरावर कौतुक होतेय. शुभमन गिल यानं रोहितला चांगली साथ दिली. रोहित शर्मानं 160 चेंडूत 3 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने शतक ठोकले. 






भारताकडे 46 धावांची आघाडी - 


कुलदीप यादव आणि अश्विन यांनी इंग्लंडला पहिल्या डावात 218 धावांत रोखलं. त्यानंतर शुभमन गिल, रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपलं. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्राचा खेळ थांबला तेव्हा भारताकडे 46 धावांची आघाडी होती. रोहित शर्मा 102 आणि शुभमन गिल 101 धावांवर खेळत आहे. भारतीय संघ एक बाद 264 अशा सुस्थितीत आहे.