त्याच्या शतकाच्या बळावर श्रीलंकेनं 50 षटकांत सहा बाद 338 धावांची मजल मारली. अविष्का फर्नांडोनं झळकावलेलं शतक श्रीलंकेच्या डावात मोलाचं ठरलं. त्यानं 103 चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांसह 104 धावांची खेळी उभारली.
विशेष म्हणजे फर्नांडोचं वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं हे पहिलंच ठरलं. श्रीलंकेकडून दिमुथ करुणारत्नेनं 32, कुशल परेरानं 64 , कुशल मेंडिसनं 39, अँजलो मॅथ्यूजनं 26 आणि लाहिरु थिरीमनेनं नाबाद 45 धावांची खेळी उभारली. करुणारत्ने आणि परेरानं श्रीलंकेला 93 धावांची सलामी दिली.
या सामन्यात अविष्का फर्नांडोने 103 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकार खेचत 104 धावा केल्या. पण शतक ठोकल्यानंतर तो लगेचच बाद झाला. या आधी श्रीलंकेच्या लाहिरू थिरिमानेने 25 वर्षाचा असताना 2015 च्या विश्वचषकात शतक ठोकले होते.
विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात जगात देखील तो तिसऱ्या क्रमांकाचा तरुण फलंदाज ठरला. या आधी पॉल स्टर्लिंगने 20 वर्षे आणि 196 दिवस वय असताना 2011 मध्ये नेदरलँड्स विरुद्ध शतक केले होते. तर रिकी पॉन्टिंगने 21 वर्ष आणि 96 दिवस वय असताना 1996 साली शतक झळकावले होते. त्यानंतर फर्नांडोने आज 21 वर्ष आणि 87 दिवस वय असताना शानदार शतक ठोकत संघाला मजबूत स्थितीत आणून ठेवले.