IND Vs SL: बंगळुरुच्या (Bengaluru) एम. चिन्नास्वामी स्डेडियवर (M Chinnaswamy Stadium) श्रीलंकाविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं  (R Ashwin) नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यात धनंजय डिसिल्व्हाची विकेट घेऊन अश्विननं दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला (Dale Steyn) मागं टाकलंय. धनंजय डिसिल्व्हाच्या रुपात त्यानं आपल्या कारकिर्दीतील 440वा कसोटी विकेट घेतला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये डेल स्टेनच्या नावावर 439 विकेट्स नोंद आहे. 


डेल स्टेननं दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना कसोटी क्रिकेटमधील 93 सामन्यात 439 विकेट्स घेतले आहेत. तर, आर. अश्विननं त्याच्या कारकिर्दीतील 86 व्या सामन्यातच 440 विकेट घेऊन मोठा पराक्रम केलाय. याआधी अश्विननं भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांचा विक्रम मोडीत काढला होता. कपिल देव यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 434 विकेट्स घेतले आहेत. ही मालिका सुरू होण्यापूर्वी अश्विनच्या खात्यात 430 कसोटी विकेट्स होत्या. सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याच्या यादीत तो टॉप-10 गोलंदाजांमध्येही नव्हता.


या मालिकेपूर्वी सर रिचर्ड हॅडली, रंगना हेराथ, कपिल देव आणि स्टेन हे चारही गोलंदाज त्याच्या पुढे होते. भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेंच्या नावावर असून या यादीत आर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुंबळेच्या खात्यात 619 कसोटी विकेट्स आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. ज्यानं 800 कसोटी विकेट्स घेतले आहेत.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha