India Next T20I Captain : चॅम्पियन कर्णधार सूर्याची खुर्ची धोक्यात! पंत, गिल नाही, तर पंजाबच्या 'सरपंच'कडे सोपवली जाणार टीम इंडियाची धुरा? BCCIच्या सूत्रांचा सर्वात मोठा दावा
India Next T20I Captain : भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या एका मोठ्या बदलाचे वारे वाहू लागले आहेत.

India Next T20I Captain : भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या एका मोठ्या बदलाचे वारे वाहू लागले आहेत. 2026 चा आयपीएल हंगाम जसजसा रंगात येत आहे, तसतशी भारतीय टी-20 संघाच्या भविष्यातील नेतृत्वाबाबतची चर्चा तीव्र झाली आहे. अशातच, बीसीसीआयच्या एका सूत्राने केलेल्या दाव्यामुळे श्रेयस अय्यरच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सध्या या संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे असले तरी, पंजाब किंग्सचा नवा 'सरपंच' म्हणजेच श्रेयस अय्यर टीम इंडियाचा पुढील कर्णधार होई शकतो, ते पाहता सूर्याच्या कर्णधारपदाच्या खुर्चीला धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे.
सूर्याचा खराब फॉर्म आणि अय्यरचा 'स्वॅग'
भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. सूर्याच्या बॅटमधून येत असून, त्याच्या या खराब फॉर्ममुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीसमोर पेच निर्माण झाला आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरने आपल्या खेळात बदल केला आहे. पंजाब किंग्सच्या ताफ्यात रिकी पाँटिंगसोबत पुन्हा एकदा एकत्र आल्यावर अय्यरचा जुना 'स्वॅग' आणि रणनीतीमधील परिपक्वता पाहायला मिळत आहे. विशेषतः टी-20 क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याचे प्रभुत्व सध्या भारतीय क्रिकेटमध्ये तोडजोड करण्यापलीकडचे आहे.
पंत आणि गिल शर्यतीतून मागे?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर निवड समितीला सूर्यकुमार यादवच्या पर्यायाचा विचार करावा लागला, तर श्रेयस अय्यर हे सर्वात प्रबळ नाव म्हणून समोर येत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांसारख्या खेळाडूंकडे निवड समितीने नेतृत्व आणि फॉर्मच्या बाबतीत काहीशी कठोर भूमिका घेतल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत श्रेयस अय्यरची नेतृत्व क्षमता ही त्याला इतरांपेक्षा वेगळी ठरवते.
श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून प्रवास
2018 मध्ये गौतम गंभीरने अर्ध्यातून कर्णधारपद सोडल्यावर दिल्लीची धुरा श्रेयसकडे आली. रिकी पाँटिंगच्या मार्गदर्शनाखाली त्याने स्वतःला एक शांत आणि संयमी नेता म्हणून सिद्ध केले. 2022 मध्ये कोलकाता नाईट रायडर्समध्ये प्रवेश केल्यावर त्याने संघाचा चेहरामोहरा बदलला. 2024 च्या आयपीएल हंगामात त्याच्याच नेतृत्वाखाली केकेआरने विजेतेपदावर नाव कोरले, ज्यामुळे दबावाखाली कामगिरी करण्याची त्याची क्षमता जगासमोर आली. सध्या पंजाब किंग्समध्ये 'सरपंच' म्हणून यशस्वी नेतृत्व करत आहे.
पुनरागमन सोपे नाही, पण अशक्यही नाही!
श्रेयस अय्यरसाठी भारतीय टी-20 संघात थेट कर्णधार म्हणून परतणे सोपे नाही. त्याने 2023 च्या उत्तरार्धापासून एकही आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळलेला नाही. इतक्या मोठ्या कालावधीनंतर त्याला थेट संघात आणि तेही नेतृत्वाच्या भूमिकेत स्थान देणे, हा बीसीसीआयसाठी (BCCI) एक धाडसी निर्णय ठरेल. सध्या निवड समितीचे लक्ष 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकावर केंद्रित आहे, त्यामुळे टी-20 फॉरमॅटमध्ये बदलासाठी त्यांच्याकडे थोडा वेळ आहे. मात्र, आयपीएल 2026 मधील श्रेयसची कामगिरी पाहता, त्याला जास्त काळ दुर्लक्षित करणे व्यवस्थापनाला कठीण जाणार आहे.
हे ही वाचा -




















