Shreyas Iyer Century : विजय हजारे ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर कहर करत आहे, या हंगामात यंदा त्याने दुसरे शतक झळकावले. त्याने पुद्दुचेरीविरुद्ध 111 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. अय्यरच्या शतकाच्या जोरावर पुद्दुचेरीविरुद्ध मुंबईने 9 बाद 290 धावा केल्या. यापूर्वी श्रेयस अय्यरने डिसेंबरमध्ये कर्नाटकविरुद्धही शतक ठोकले होते.  


गुजरात कॉलेज मैदानावर शुक्रवारी झालेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या सहाव्या फेरीत मुंबईने नाणेफेक जिंकून पुद्दुचेरीविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. पण मुंबई संघाची सुरूवात खराब झाली. मुंबईने 82 धावांत 5 विकेट गमावल्या. दरम्यान, कर्णधाराने संधीचा फायदा घेत एक चांगली कामगिरी करत आपल्या संघासाठी मौल्यवान खेळी खेळली. श्रेयस अय्यरने नाबाद 137 (133) धावा केल्या. या खेळीत 16 चौकार आणि 4 षटकार मारले. अय्यरशिवाय मुंबईच्या इतर कोणत्याही फलंदाजाला 50 धावाही करता आल्या नाहीत.




श्रेयस अय्यरने 4 डावात केल्या 312 धावा 


सध्याच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यरने 4 डावात 312 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत त्याने 27 चौकार आणि 18 षटकार मारले आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 138 आहे. पुद्दुचेरीविरुद्ध श्रेयस 64 धावांवर खेळत असताना संघाची नववी विकेट पडली होती. यानंतर त्याने तुफानी फलंदाजी करत आपले शतक पूर्ण केले.


चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दावेदारी


श्रेयस अय्यरने आपल्या कामगिरीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दावेदारी ठोकली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधून घेण्याची सुवर्णसंधी टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या खेळाडूंना आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने यूएईमध्ये खेळणार आहे.


भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यावर टांगती तलवार?


एकीकडे अय्यर चमकदार कामगिरी करत आहे. त्यामुळे 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शर्यतीत तो सामील झाला आहे. पण दुसरीकडे भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादववर टांगती तलवार आहे. कारण या सामन्यात तो गोल्डन डकचा बळी ठरला होता. तो एक स्टार खेळाडू आहे आणि निवडकर्ते त्याच्याकडे इतक्या सहजपणे दुर्लक्ष करू शकत नाहीत. सूर्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये 4 सामन्यात केवळ 38 धावा केल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताला मायदेशात इंग्लंडविरुद्ध मालिका खेळायची आहे. त्यातून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवडला जाईल.


हे ही वाचा -


Ind vs Aus 5th Test : सिडनीमध्ये राडा! कॉन्स्टास बुमराहला भिडला, विकेट पडताच अख्खी टीम इंडिया अंगावर गेली धावून... पाहा Video