IND vs AUS, 1st ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात पहिल्या एकदिवसीय सामन्याला मुंबईच्या वानखेडे मैदानात (Wankhede Stadium) सुरुवात होत आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली आहे. ऑस्ट्रेलियाला कमी धावांत रोखून निर्धारीत लक्ष्य लवकरात लवकर पार करण्या भारताचा डाव आहे. दरम्यान भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे आजचा सामना खेळत नसल्यानं हार्दिक पांड्या कर्णधार आहे. याशिवाय प्लेईंग 11 चा विचार केल्यास रोहित शर्मा सोडता इतर दमदार आणि दिग्गज खेळाडू संघात आहेत.
सलामीला फॉर्मात असणारा शुभमन गिल आणि ईशान किशन (Shubhman Gill and Ishan Kishan) आहे. त्यानंतर विराट कोहली, सूर्यकुमार यादव हे दोघे आहेत. त्यानंतर विशेष म्हणजे केएल राहुल (KL Rahul) मधल्या फळीत फलंदाजीला येणार आहे. त्यानंतर शार्दूल ठाकूरही (Shardul Thakur) बऱ्याच काळानंतर संघात परतत आहे. तर हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा हे दिग्गज अष्टपैलू संघात असून कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी हे गोलंदाजी सांभाळणार आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघातही मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस अॅडम झाम्पा असे मर्यादीत षटकांचे स्टार खेळाडू परतले असून स्टीव्ह स्मिथ कर्णधार आहे. तर नेमकी दोन्ही संघाची प्लेईंग 11 कशी आहे पाहूया...
कशी आहे दोन्ही संघाची अंतिम 11?
भारतीय संघ : शुभमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पांड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलिया संघ : ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशॅग्ने, जोश इंग्लिस (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा
कुठे पाहाल सामना लाईव्ह?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1 या चॅनेलवर दुपारी 1.00 वाजता सुरु होईल. तसंच या सामन्याचं ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार या अॅप आणि वेबसाइटवरुन पाहता येईल.
हे देखील वाचा-