IND vs AUS, Weather Report :  भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील वनडे मालिका आज म्हणजेच 17 मार्चपासून सुरु होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) होणार आहे. पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून मालिकेत आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा इरादा असणार आहे.. त्याचबरोबर दुसरीकडे कांगारु संघाला कसोटी मालिकेतील पराभवाच्या निराशेतून बाहेर यायला आवडेल. पण अशाच या पहिल्याच सामन्यात पावसाने व्यत्यय आणला तर? दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान मुंबईत हवामान कसे असेल ते जाणून घेऊ...


कशी आहे हवामानाची स्थिती?


हवामान विभागाच्या अहवालानुसार भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 मार्च रोजी होणाऱ्या सामन्यादरम्यान मुंबईचे हवामान क्रिकेटसाठी अनुकूल असेल. सामन्याच्या वेळी मुंबई शहराचे तापमान 33 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर पाच टक्के आकाश ढगाळ राहिल. या दरम्यान आर्द्रता 46 टक्के राहिल. एकूणच, सामन्यादरम्यान खेळाडूंना आर्द्रतेचा सामना करावा लागू शकतो.


हार्दिक असणार कर्णधार


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत नियमित कर्णधार रोहित शर्मा गैरहजर असेल. वैयक्तिक कारमुळे तो या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी हार्दिक पांड्या पहिल्या वनडेत कर्णधारपद भूषवणार आहे. हार्दिक वनडेत भारताची धुरा सांभाळण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी त्याने टी-20 मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. दरम्यान, जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत त्याने टीम इंडियाच्या बॉलिंग युनिटला पाठिंबा दिला आहे. हार्दिकच्या मते, "जसप्रीत बुमराह बऱ्याच दिवसांपासून संघात नाही. तसंच गोलंदाजी गट चांगली कामगिरी करत आहे. पण बुमराहचं संघात नसणं फार मोठी गोष्ट आहे."


कसे आहेत दोन्ही संघ?


भारताचा एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), युझवेंद्र चहल, इशान किशन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव.


ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा


हे देखील वाचा-