IND vs WI Shai Hope : वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजने उभारलेल्या 311 धावांच्या डोंगरात सर्वाधिक धावा फलंदाज शाय होपने (Shai Hope) केल्या. त्याने 115 धावा करत शतक झळकावलं. पण हे शतक त्याच्यासाठी खास ठरलं. कारण होप त्याच्या कारकिर्दीतील 100 वा एकदिवसीय सामना खेळताना त्याने हे शतक झळकावलं आहे. होपने 135 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकार ठोकत 115 धावा केल्या.

या शतकाच्या जोरावर शाय होप काही खास क्रिकेटर्सच्या यादीत तो सामिल झाला आहे. या क्रिकेटर्सनी त्यांच्या कारकिर्दीतील 100 व्या एकदिवसीय सामन्यात 100 हून अधिक धावा ठोकल्या आहेत. या यादीत वेस्ट इंडीजचाच ख्रिस गेल अव्वल स्थानी असून त्याने इंग्लंडविरुद्ध 2004 मध्ये 132 धावा केल्या होत्या. 

100 व्या एकदिवसीय सामन्यात सर्वोच्च स्कोर 

खेळाडू धावा सामना
ख्रिस गेल 132 वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड (2004)
मोहम्मद यूसुफ 129 पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (2002)
डेविड वॉर्नर 124 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2006)
ख्रिस केर्न्स 115 भारत विरुद्ध न्यूझीलंड  (1999)
रामनरेश सरवन 115 भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (2006)
शाय होप 115 भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (2022)

हे देखील वाचा-