IND vs WI, 2nd ODI : भारतीय संघ आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु असून पहिला सामना भारताने जिंकल्यानंतर आता दुसरा सामना खेळवला जात आहे. नुकतीच नाणेपफेक झाली असून वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. दरम्यान भारतीय संघात यावेळी एक बदल करण्यात आला असून युवा वेगवान गोलंदाज आवेश खान आयपीएल गाजवल्यानंतर आता भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण करत आहे. आजच्या सामन्यात त्याला प्रसिध कृष्णाच्या जागी खेळवण्यात आलं आहे.


पहिला सामना भारताने अवघ्या 3 धावांनी जिंकला होता. त्यात आजही वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकली आहे. पण पहिल्या सामन्यात त्यांना आव्हानाचा पाठलाग करणं अवघड झाल्यानं आज त्यांनी प्रथम फलंदाजी घेतली आहे. दरम्यान अशामध्ये भारत वेस्ट इंडीजच्या स्फोटक फलंजदाजांना स्वस्तात रोखेल का? तसंच समोर असलेलं आव्हान पार करेल का? हे पाहावं लागेल. भारताकडून आवेश खानने डेब्यू केला असून नेमका संघ कसा आहे पाहूया...



भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, जाडेजा, संजू सॅमसन (विकेटकिपर), शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, आवेश खान, मोहम्मद सिराज.



भारत मालिकेत आघाडीवर


भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत 3 धावांनी विजयी झाला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. सामन्यात वेस्ट इंडीजच्या रोमारीयो शेफर्ड आणि अकेल हुसेन यांनी अखेरच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी केली, पण केवळ 3 धावा कमी पडल्याने वेस्ट इंडीज सामना जिंकू शकले नाहीत. आधी फलंदाजी करत भारताने 50 षटकात 308 धावा केल्या. विजयासाठी वेस्ट इंडीजला 50 षटकात 309 धावा करायच्या होत्या. पण वेस्ट इंडीज 50 षटकात 6 गडी गमावून 305 धावाच करु शकले.


हे देखील वाचा-