Krunal Pandya Blessed with Baby Boy : भारताचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) बाबा झाला असून त्याच्या घरी एका गोंडस बाळाने जन्म घेतला आहे. क्रुणाल पांड्याची पत्नी पंखुरी शर्मा (Pakhuri Sharma) हिने एका मुलाल जन्म दिला आहे. पांड्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडियावरुन (Social Media) पत्नीसह बाळाचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे.
क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) मागील काही काळापासून भारतीय संघात दिसत नाही. पण आयपीएलमध्ये मात्र त्याची सातत्यपूर्ण कामगिरी सुरु आहे. दरम्यान आता मात्र क्रुणाल बाबा झाल्याने त्याच्याकडे एक नवी जबाबदारी आली आहे, क्रुणालची पत्नी पंखुरी आणि मुलासोबतचे फोटो क्रुणालने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले असून यावेळी त्याच्या बाळाचं नावही त्याने कॅप्शनमधून आपल्या मुलाचं नावही सर्वांना सांगितलं आहे. क्रुणालने त्याच्या मुलाचं नाव कवीर ठेवलं असून फोटोंना कवीर क्रुणाल पांड्या (Kavir Pandya) असं कॅप्शन दिलं आहे.
मेहनतीच्या जोरावर मिळवलं सारंकाही
यंदा आयपीएलमध्ये नव्याने सामिल झालेल्या लखनौच्या संघात क्रुणाल पांड्या खेळताना दिसून आला. पण त्याआधी त्याने मुंबई इंडियन्स संघाकडून अनेक सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. पण क्रुणाल आणि त्याचा भाऊ हार्दिक हे दोघेही अत्यंत मेहनत करुन इथवर पोहोचले आहेत. कृणाल पांड्यानं त्याच्या आयुष्यात खूप आर्थिक संकटाचा सामना केलाय. दुसऱ्यांकडून बॅट घेऊन तो क्रिकेट खेळायचा. परंतु, आज त्याला यशस्वी क्रिकेटर म्हणून ओळखलं जातं. क्रुणालनं आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवलं. त्यानं मुंबईकडून या खेळाडूनं 84 आयपीएल सामने खेळले. ज्यात त्यानं 1143 धावा आणि 51 विकेट्सही घेतल्या. याशिवाय यंदा लखनौकडून देखील क्रुणालने चमकदार कामगिरी केली .
हे देखील वाचा-
- Avesh Khan ODI Debut : आयपीएल गाजवल्यानंतर एकदिवसीय संघात आवेशची एन्ट्री, कशी आहे आतापर्यंतची कारकीर्द
- IND vs WI, 2nd ODI, Toss Update : आजही नाणेफेक वेस्ट इंडीजच्याच बाजूने, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
- WI Vs IND: अखेरच्या षटकात 15 धावा रोखण्याचं आव्हान, दोन आक्रमक फलंदाज क्रिजवर; त्यांनाही पुरून उरला मोहम्मद सिराज!