Shoaib Malik And Sania Mirza Son Izhaan : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकनं तिसऱ्यांदा लग्न केलं आहे. मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत तिसरे लग्न केलं आहे. रिपोर्टमध्ये सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचा घटस्फोट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पण आता प्रश्न उपस्थित होत आहे की सानिया आणि शोएबचा मुलगा इझानचं काय होणार? त्याचा ताबा कोणाकडे जाणार? याची चर्चा सुरु झाली आहे. 






सानिया मिर्झा आणि शोएब मलिक खर्च उचलणार


दरम्यान, कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शोएबने भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाला घटस्फोट दिला आहे. तसेच दोघेही परस्पर संमतीने वेगळे झाले आहेत. शोएब मलिक आणि सानिया मिर्झाचा मुलगा इझान दुबईत राहणार आहे. आई-वडील दोघे मिळून मुलाचा खर्च उचलतील. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक 2018 मध्ये मुलगा इझान झाला. 






शोएब मलिकनं सना जावेदसोबत तिसरं लग्न केलं आहे. शोएब मलिकच्या पहिल्या पत्नीचे नाव आयेशा सिद्दीकी होते. सानिया मिर्झाशी लग्न करण्यापूर्वी शोएबने पहिली पत्नी आयशाला 2010 मध्ये घटस्फोट दिला होता. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर सानिया आणि शोएबचे नाते सुरवातीला सुरळीत होते. तथापि, गेल्या काही काळापासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. नंतर हे प्रकरण हे दोघे घटस्फोट घेतील इथपर्यंत येऊन पोहोचले. असा घडामोडींचा सिलसिला सुरु असतानाच शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले.






सना जावेदचं सुद्धा दुसरं लग्न 


शोएब मलिकचे हे तिसरे लग्न असंल,तरी तर सना जावेदही मागे नाही. सना जावेदने शोएब मलिकसोबत दुसरं लग्न केलं आहे. यापूर्वी 2020 मध्ये सनाने गायक उमर जसवालसोबत लग्न केले होते. पण त्यांचे नाते फार काळ चांगले राहिले नाही आणि ते वेगळे झाले. यानंतर शोएब आणि सनाचे अफेअर असल्याच्या अफवा पसरल्या होत्या, ज्या दोघांनी लग्न करून आता खऱ्या केल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या