Sarfaraz Khan : देशांतर्गत क्रिकेटमध्ये अफलातून कामगिरी करणाऱ्या सरफराज खानला (Sarfaraz Khan) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीच्या संघात संघात स्थान मिळालं नव्हतं. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या 2 कसोटी सामन्यांसाठी सरफराज खानची निवड होऊ शकते, असे मानले जात होते, परंतु निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला नाही. पण आता मुंबईच्या या खेळाडूची इराणी चषकासाठी देखील निवड झालेली नाही. ज्यानंतर मात्र सोशल मीडियावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे, सरफराज खानची निवड न झाल्याबद्दल सोशल मीडियावर चाहते संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.


सोशल मीडियावर चाहत्यांचा धुमाकूळ


सरफराजची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी वाखाणण्याजोगी असल्याचं आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसून येतं. याशिवाय रणजी ट्रॉफी 2023 च्या मोसमातही सरफराज खानच्या बॅटमधून अक्षरश: धावांचा पाऊस पडला होता. यंदाच्या हंगामात मुंबईच्या या युवा खेळाडूने तब्बल 556 धावा केल्या. रणजी ट्रॉफी 2023 हंगामात सरफराज खानची सरासरी 90 पेक्षा जास्त होती. त्याच वेळी, सरफराज खानने 2019-20 हंगामापासून 26 सामने खेळले आहेत. या 26 सामन्यांमध्ये सरफराज खानने 12 शतकं आणि 7 अर्धशतकं केली आहेत. त्याचबरोबर त्याने 26 सामन्यांत 2970 धावा केल्या. पण या साऱ्यानंतरही त्याची इराणी कपसाठीच्या संघात निवड न झाल्याने चाहते नाराज झाले आहेत. 






















 


इराणी ट्रॉफीसाठी भारताचा उर्वरित संघ-


मयंक अग्रवाल, सुदीप कुमार घरामी, यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, हार्विक देसाई, मुकेश कुमार, अतित सेठ, चेतन साकारिया, नवदीप सैनी, उपेंद्र यादव, मयंक मार्कंडे, सौरभ कुमार, आकाश दीप, बाबा इंद्रजित, पुलकित नारंग, यश धवल


इराणी ट्रॉफीसाठी मध्य प्रदेशचा संघ-


रजत पाटीदार, यश दुबे, हिमांशू मंत्री, हर्ष गवळी, शुभम शर्मा, व्यंकटेश अय्यर, अक्षत रघुवंशी, अमन सोलंकी, कुमार कार्तिकेय, सरांश जैन, आवेश खान, अंकित कुशवाह, गौरव यादव, अनुभव अग्रवाल, मिहिर हिरवाणी.


हे देखील वाचा-