Sarfaraz Khan Jumps Video : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील बंगळुरू येथे सुरू असलेला कसोटी सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या 46 धावांत गुंडाळला गेला तेव्हा रोहित शर्मा अँड कंपनीवर जगभरातून टीका होत होती, मात्र आता याच संघाने शानदार पुनरागमन करून जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. टीम इंडिया दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करत आहे. सरफराज खानने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावून दाखवून दिले की त्याला संधी मिळाल्यास तो भारतासाठी लंबी रेस का घोडा बनू शकतो.


बंगळुरू कसोटीच्या चौथ्या दिवशी सरफराज खानने 115 चेंडूत शतक पूर्ण केले. मात्र, याआधी मैदानावर एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला मिळाला. जे पाहून तुम्हीही हसू थांबणार नाही. रन काढताना सरफराज आणि ऋषभ पंत यांच्यात गैरसमज झाला. यानंतर सरफराजने जे केले त्यानंतर सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.






ऋषभ पंत आणि सरफराजचा व्हिडिओ व्हायरल 


भारतीय डावाच्या 56व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ही रंजक घटना घडली. मॅट हेन्रीच्या चेंडूवर सरफराजने कट शॉट मारला. दोघांनी पहिली धाव घेतली. नंतर दुसरी धाव घेण्याचा विचार केलेला असतानाच ते शक्य नसल्याचे लक्षात येताच सरफराजने पंतला धाव नाकारण्यासाठी आवाज दिला. मात्र दुसऱ्या टोकाला ऋषभ पंत चेंडू न पाहता धावू लागला. त्यावेळी सरफराज उड्या मारून पंतला सांगण्याचा प्रयत्न करत होता. ज्यांचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी मैदानावर घडलेला हा अप्रतिम ड्रामा पाहून ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या भारतीय खेळाडूंनाही हसू आवरता आले नाही. रोहित शर्मा, गौतम गंभीर आणि अश्विन यांची प्रतिक्रियाही पाहण्यासारखी होती.




बेंगळुरू येथे सुरू असलेल्या भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान आपण टीम इंडियाच्या विजयाबद्दल बोलू शकू, असे कुणालाही वाटले नसेल. पाऊस पडेल आणि सामना अनिर्णित राहील, अशी प्रार्थना अनेकजण करू लागले, पण सरफराज खानचे शतक आणि ऋषभ पंतच्या अर्धशतकाने वातावरण बदलले. चौथ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत भारताने तीन गडी गमावून 344 धावा केल्या होत्या. 125 धावा करूनही सरफराज उभा आहे आणि दुसऱ्या टोकाला ऋषभ पंत चौकार आणि षटकार मारून किवी गोलंदाजांचे होश उडवत आहे. टीम इंडिया अजूनही न्यूझीलंडच्या स्कोअरपेक्षा 12 धावांनी मागे आहे. आज संध्याकाळपर्यंत दोघेही असेच खेळले तर रोहित शर्माचा संघ पुन्हा एकदा बंगळुरूमध्ये चमत्कार घडवू शकतो.




हे ही वाचा -


Sarfaraz Khan Century : भन्नाट सेलिब्रेशन! शतक ठोकल्यानंतर सरफराजचा आनंद गगनात मावेना, मैदानात सुटला पळत, Video