Sarfaraz Khan Century in England : भारताचा अ संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील मुख्य संघासोबत सराव सामना खेळत आहे. दुसऱ्या दिवशी सरफराज खानने जबरदस्त कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. टीम इंडियातून सातत्याने डच्चू मिळत असतानाही सरफराजने हार मानली नाही. उलट त्याने इंग्लंडमध्ये 76 चेंडूंमध्ये 101 धावांची झंझावाती खेळी खेळली. सरफराजच्या या शतकी खेळीने पुन्हा एकदा निवड समितीला विचार करायला लावलं आहे, याआधीही त्याने इंग्लंडमध्ये एक शानदार खेळी खेळली होती.
भारत आणि भारत अ संघातील आंतर-संघ सराव सामना केंटी काउंटी ग्राउंडवर खेळला जात आहे. सरफराज खानने शतक झळकावले, तर जसप्रीत बुमराहला एकही विकेट मिळाला नाही, मोहम्मद सिराजने 2 बळी घेतले पण त्याने खूप धावा दिल्या.
सराव सामन्यात सरफराजचं शतक तर बुमराहला मिळाला नाही विकेट...
सरफराज खानची इंग्लंडविरुद्धच्या कसोटी संघात निवड झाली नाही, परंतु तो भारत अ संघासोबत इंग्लंडला पोहोचला. यापूर्वी त्याने इंग्लंड लायन्सविरुद्ध 92 धावांची अद्भुत खेळी खेळली होती, आता त्याने शुभमन गिल आणि सराव सामन्यात संघाविरुद्धही शतक झळकावले आहे. त्याच्या सातत्यपूर्ण चांगल्या कामगिरीमुळे, त्याने निवडकर्त्यांना सांगितले आहे की तो या दौऱ्यासाठी देखील तयार आहे.
सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही जसप्रीत बुमराहला एकही विकेट घेता आली नाही. त्याने 5 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या. सिराजने 2 विकेट घेतल्या, पण त्याची इकॉनॉमी ७ होती. प्रसिद्ध कृष्णाने 2 आणि नितीश कुमार रेड्डीने 1 विकेट घेतली. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस भारत अ संघाचा स्कोअर 266/6 होता. साई सुदर्शनने 38 धावा आणि इशान किशनने 45 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड शून्यावर आऊट झाला.
सरफराज खानसाठी BCCI संघात करणार बदल?
संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी याबद्दल मोठी गोष्ट सांगितली होती. त्यांनी सांगितले होते की, जर एखाद्या खेळाडूने चांगली कामगिरी केली तर त्याला दौऱ्याच्या मध्यभागीही बोलावले जाऊ शकते. हेच कारण आहे की सरफराज प्रत्येक संधीचा फायदा घेऊ इच्छितो, जेणेकरून जर कोणताही खेळाडू कोणत्याही कारणास्तव बाहेर पडला तर त्याला मुख्य संघात स्थान मिळू शकेल.
भारत विरुद्ध भारत अ सराव सामना थेट प्रक्षेपित किंवा लाईव्ह स्ट्रीम केला जात नाही. भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना २० जूनपासून खेळला जाईल. तो सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल आणि लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहोस्टर अॅपवर असेल.
हे ही वाचा -