England vs India 1st Test Playing XI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया 7 जूनपासून इंग्लंडला पोहोचली आहे आणि सराव करत आहे. आता भारत आणि भारत-अ संघात एक आंतर-संघ सामना खेळला जात आहे, ज्यामध्ये भारतीय संघाचा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी अर्धशतके झळकावली आहेत.  

दरम्यान, भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन यांनी कुलदीप यादवला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सातत्यपूर्ण खेळण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला आश्चर्यकारक आहे, कारण भारत सहसा इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर फक्त एकाच फिरकी गोलंदाजाला खेळवतो. पण अश्विनचा असा विश्वास आहे की, जिंकण्यासाठी सर्वात मजबूत गोलंदाजी युनिट निवडले पाहिजे आणि त्यांच्या मते कुलदीपचा त्यात समावेश केला पाहिजे. जो टीम इंडियाचा ट्रम्प कार्ड ठरू शकतो.

अश्विनने एका मुलाखतीत म्हटले आहे की, "जेव्हा फलंदाज फॉर्ममध्ये असतात तेव्हा सामना जिंकण्यासाठी सर्वोत्तम गोलंदाजी युनिटची आवश्यकता असते. जर खेळपट्टीवर ओलावा नसेल, तर माझ्या मते कुलदीप यादव संघात कायमचा असला पाहिजे. आणि ओलावा असला तरी कुलदीपने खेळायला हवे." 2021 च्या इंग्लंड कसोटी मालिकेत भारताने फक्त रवींद्र जडेजाला फिरकी गोलंदाज म्हणून खेळवले, तर अश्विनसारख्या अनुभवी गोलंदाजाला बाहेर बसावे लागले. पण यावेळी संघ संयोजनात बदल होऊ शकतो.

कुलदीपचा चांगला रेकॉर्ड...

कसोटी क्रिकेटमध्ये कमी संधी मिळाल्या असूनही कुलदीप यादवने सातत्याने विकेट्स घेतल्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तो फक्त एकाच कसोटीत विकेटलेस राहिला, 2018 मध्ये लॉर्ड्सवर, जो इंग्लंडविरुद्धही होता.

भारतीय गोलंदाजी युनिटचे कौतुक 

अश्विनने भारतीय गोलंदाजी युनिटचे कौतुक केले आणि म्हटले की, "जसप्रीत बुमराह रवींद्र जडेजासोबत नंबर 1 असला पाहिजे, ज्याच्याकडे नियंत्रण आहे आणि तो टॉप-6 मध्ये फलंदाजी देखील करू शकतो. ही गोलंदाजी युनिट कोणत्याही खेळपट्टीवर कोणत्याही फलंदाजीला आऊट करू शकते. मोहम्मद सिराजलाही विसरू नये, जो चांगली गोलंदाजी करतो." त्यामुळे कुलदीप यादवला पहिल्या कसोटीत संधी मिळेल का? की कर्णधार शुभमन गिल दुसरा मोठा निर्णय घेणार हे 20 तारखेला कळेल.

हे ही वाचा -

बंगळुरूमधील चेंगराचेंगरीनंतर बीसीसीआयची मोठी अ‍ॅक्शन! 'या' घटनांना आळा घालण्यासाठी घेतला तडकाफडकी निर्णय