David Warner on Air India Plane Crash In Ahmedabad: अहमदाबाद विमान अपघातात 270 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गुजरातच्या राजधानीत घडलेल्या या घटनेने केवळ भारतातील लोकांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला धक्का बसला. या दुःखद अपघाताने साऱ्यांचे मन अगदी हेलावून गेलं आहे. अशातच या अपघाताबद्दल माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर यांनीही मोठं विधान करत सांगितलं आहे की, तो पुन्हा कधीही एअर इंडियाने प्रवास करणार नाही.
एअर इंडियाच्या सेवेवर डेव्हिड वॉर्नरचा प्रश्न
ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नर यांनी यापूर्वीही एअर इंडियाच्या सेवेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एकदा वॉर्नरने एक्सवर पोस्ट केले होते की त्यांना एअर इंडियाच्या एका विमानात बसवण्यात आले होते ज्यामध्ये पायलट नव्हता. वॉर्नरने एअर इंडियाला प्रश्न केला की जेव्हा तुमच्याकडे पायलट नाही तर तुम्ही लोकांना विमानात चढण्याची परवानगी का देता? अहमदाबादमधील अपघातानंतर आता वॉर्नरने एअर इंडियाच्या विमानात चढण्यास नकार दिला आहे.
आतापर्यंत 270 जणांचे सापडले मृतदेह
डॉक्टरांनी शनिवारी (14 जून) सांगितले की, विमान अपघातस्थळावरून आतापर्यंत सुमारे 270 मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत. डॉ. पटेल म्हणाले की, अपघातग्रस्त एअर इंडियाच्या विमानातील २४२ प्रवाशांपैकी एकमेव वाचलेले विश्वास कुमार रमेश यांची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर आहे. अपघातातील बहुतेक जखमींना डिस्चार्ज देण्यात आला असून एक किंवा दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदाबादमधील दुर्दैवी घटनेनं संपूर्ण देश हादरला!
गुजरातमधील अहमदाबादमध्ये 12 जून रोजी एअर इंडियाचं विमान कोसळल्याची भयावह दुर्घटना घडली. या घटनेनं संपूर्ण देश हादरला. सदर विमान अपघातामध्ये आतापर्यंत एकूण 275 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 241 विमानातील प्रवासी, ज्यामध्ये 12 क्रू मेंबर्स होते. अपघाताच्यादरम्यान ज्या बीजे मेडिकल कॉलेजवर विमान कोसळले त्या वसतिगृहाच्या इमारतीत 60 हून अधिक डॉक्टर, विद्यार्थी आणि काही इतर लोक उपस्थित होते. त्यापैकी 34 जणांचा मृत्यू झाला आहे. तर विमानातील एक प्रवासी वाचला. सध्या या अपघाताची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
आयुष्यात पहिलाच विमान प्रवास, धाकट्या मुलाला लंडनला जाऊन भेटण्याची आई-वडिलांची ओढ, मात्र पवार कुटुंबावर काळाचा घाला झाला. धाकट्या मुलाला लंडनला भेटण्यासाठी निघालेले मूळ सांगोल्याचे असलेले महादेव पवार आणि आशाताई पवार यांचा अहमदाबाद विमान अपघात मृत्यू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या