Sara Tendulkar Viral Photo : बॉलिवूड अभिनेत्रींच्या फोटो आणि व्हिडिओसोबत छेडछाड केल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. अभिनेत्रींच्या फोटो आणि व्हिडीओला फोटोशॉप्ड, मोप्ड आणि डीपफेकद्वारे छेडछाड केली जाते. अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा नुकताच डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओनंतर अभिनेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिच्या फोटोसोबत छेडछाड करण्यात आली आहे. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांचा फोटो व्हायरल झालाय. सारा तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका फोटोला फोटोशॉप्ड करण्यात आलेय.
सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांचा फोटो व्हायरल -
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये, सारा तेंडुलकर तिचा रूमर्ड बॉयफ्रेंड शुभमन गिलच्या गळ्यात हात घालून दिसत आहे. हा फोटो धोनी पोपा नावाच्या युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने कॅप्शन लिहिले आहे - 'साराने शुभमन गिलला डेट करत असल्याचे कन्फर्म केलेय'. या पोस्टनंतर साराचा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झालाय. मात्र, याच फोटोवर आणखी एका युजरने कमेंट करून सत्य उघड केले आहे. युजरने साराचा खरा फोटो शेअर करत हा फोटो फेक असल्याचे म्हटले आहे. सारा शुभमन गिलसोबत नाही तर तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकरसोबत दिसत आहे.
पाहा व्हायरल होणारा फोटो -
साराची खरी पोस्ट काय ?
सारा तेंडुलकरने आपल्या इन्स्टाग्रामवर भाऊ अर्जुन तेंडुलकरसोबत फोटो पोस्ट केला होता. अर्जुन तेंडुलकरच्या 24 व्या वाढदिवसाला सारा तेंडुलकरने फोटो पोस्ट केला होता. ओरिजन फोटोमध्ये अर्जुन तेंडुलकर खुर्चीवर बसलाय अन् साराने त्याला मिठी मारल्याचे फोटोत दिसत आहे. फोटोमध्ये अर्जुन आणि सारा हसत असल्याचे दिसतेय. साराने या पोस्टद्वारे अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण एका युजर्सने याच फोटोसोबत छेडछाड केली.
सारा-शुभमनची चर्चा -
सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या अफेयरची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. दोघांना अनेकदा स्पॉटही करण्यात आलेय. नुकतेच जिओ वर्ल्ड येथेही दोघे स्पॉट झाले होते. दोघांमध्ये अफेयर असल्याच्या चर्चा आहे. सारा अथवा शुभमन गिल यांच्याकडून यावर कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. दरम्यान, अनेक अभिनेत्रींना फोटोशॉप्डमुळे त्रास सहन करावा लागलाय. नुकतेच रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावर तिला स्पष्टीकरण द्यावे लागले. त्याशिवाय अमिताभ बच्चनसह अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली होती.