Mohammed Shami In World Cup 2023 : विश्वचषकात भारतीय गोलंदाजांचा भेदक माऱ्यामुळे प्रतिस्पर्धी संघामधील फलंदाजांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शामी या त्रिकुटापुढे दिग्गज फलंदाजही ढेपाळले. शामीला पहिल्या पाच सामन्यात संधी मिळाली नाही, पण हार्दिक दुखापतग्रस्त झाला अन् शामीचे दरवाजे उघडले. त्यानंतर शामीने आपल्या खेळीने सर्वांनाच चकीत केले. शामीने फक्त तीन सामन्यात 14 विकेट्स घेत खळबळ माजवली. मोहम्मद शामीवर क्रिकेट विश्वातून कौतुकाची थाप पडत आहे.  एकीकडे संपूर्ण क्रिकेट विश्वात शामीच्या अप्रतिम कामगिरीने चक्रावून गेलेत, तर दुसरीकडे त्याची पत्नी हसीन जहाँने पतीच्या यशावर केले विधान चर्चेत आहे. 

Continues below advertisement

एका वृत्तवाहिनीवर बोलताना हसीन जहाँ हिला मोहम्मद शामी आणि टीम इंडियाच्या विश्वचषकातील कामगीरीवर विचारण्यात आले. या प्रश्नावर सुरुवातीला हसीन जहाँ म्हणाली की, मला क्रिकेटमधील फारसे समजत नाही. मी क्रिकेट पाहत नाही. पण भारतीय संघ चांगला खेळत आहे तर चांगलेच आहे. शामी चांगली कामगिरी करत असेल, तर चांगली कमाई करेल. हे कुटुंबाच्या भवितव्यासाठी चांगले आहे. शामी चांगला खेळला तर संघातील स्थान कायम राहील. त्यामुळे आमचे भविष्यही सुरक्षित राहील, असे हसीन जहाँ म्हणाली. 

मोहम्मद शामी चांगली कामगिरी करत आहे. चांगला खेळला नाही तर तो संघात राहणार नाही. पण चांगला खेळला तर संघात राहील. त्याशिवाय तो चांगली कमाईही करेल. त्यामुळे आमचे भविष्य सुरक्षित होईल, असे हसीन शहाँ म्हणाली. त्याशिवाय, मी टीम इंडियाला माझ्या शुभेच्छा देईन पण शमीला नाही, असेही हसीन जहाँ म्हणाली. 

Continues below advertisement

हसीन जहाँचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी हसीन जहाँवर टीकेची झोड उडवली आहे. 

मोहम्मद शामीची विश्वचषकातील कामगिरी - 

मोहम्मद शामीने याला यंदाच्या विश्वचषकात सुरुवातीच्या पाच सामन्यांना बेंचवरच बसवले होते. पण पुण्यात हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर मोहम्मद शामीला टीम इंडियात स्थान मिळाले. मोहम्मद शामीने तीन सामन्यात 14 विकेट् घेऊन खळबळ माजवली. शामीने न्यूझीलंडविरोधात पाच, इंग्लंडविरोधात चार आणि श्रीलंकेविरोधात पाच विकेट्स घेतल्या. मोहम्मद शामी विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने झहीर खानचा विक्रम मोडीत काढलाय. मोहम्मद शामी आयसीसी क्रमवारीत दहाव्या स्थानावर आहे. आजच आयसीसीने वनडे क्रमवारी जारी केली. यामध्ये मोहम्मद शामीने दहावे स्थान काबिज केलेय.