Sanju Samson Ranji Trophy : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून (16 ऑक्टोबर) सुरू होत आहे. या सामन्यावर पावसाचा परिणाम होऊ शकतो. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्यापूर्वी एक वाईट बातमी येत आहे, जिथे नाणेफेकला विलंब झाला आहे.


याआधी भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध कसोटी आणि टी-20 मालिका खेळल्या गेली. ज्यामध्ये संजू सॅमसनने अलीकडेच बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात शतक झळकावले. त्याने 40 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि टी-20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा रोहित शर्मानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू बनला. मात्र, आता संजू रेड बॉलमध्ये पुनरागमन करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तो रणजी ट्रॉफीमध्ये केरळसाठी दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज आहे.


दुसऱ्या कसोटी सामन्यात संजू सॅमसनची एन्ट्री


भारत-बांगलादेश मालिकेतील सहभागामुळे संजू रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात केरळकडून खेळू शकला नाही. मात्र आता तो दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. तो दुसरा सामना कर्नाटकविरुद्ध खेळणार असून तो 18 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. केरळने पंजाबविरुद्ध पहिला सामना खेळला आणि 8 गडी राखून शानदार विजय मिळवला. आता सॅमसनच्या पुनरागमनाने सचिन बेबीच्या नेतृत्वाखालील केरळला आणखी बळ मिळाले.


संजू सॅमसनने व्यक्त केली कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा 


बांगलादेश मालिका संपल्यानंतर संजू सॅमसनने मीडियाशी बोलणे पसंत केले. त्याने भारताकडून कसोटी खेळण्याची इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला की, मला वाटते की मी कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी होऊ शकतो. मला फक्त मर्यादित षटकांपुरते मर्यादित ठेवायचे नाही. मला भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळायचे आहे.  









रणजी ट्रॉफीसाठी केरळचा संपूर्ण संघ - 


संजू सॅमसन, सचिन बेबी, मोहम्मद अझरुद्दीन, विष्णू विनोद, केएम आसिफ, बासिल थंपी, बाबा अपराजित, जलज सक्सेना, आदित्य सरवटे, एमडी निधिश, अक्षय चंद्रायन, फाजील फनुस, वत्सल गोविंद, कृष्णा प्रसाद, रोहन कुन्नूमल, सलमान निजार, बसल एनपी. 


हे ही वाचा -


India Vs New Zealand 1st Test : बंगळुरूमध्ये पावसाचा कहर; टॉसला उशीर, किती वाजता होणार नाणेफेक?, जाणून घ्या अपडेट


ENG VS PAK: इंग्लंडने चेंडूला लकाकी देण्यासाठी शोधला नवा प्रकार; दृश्य बघून मैदानात पिकला हशा