India vs South Africa 1st T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना डर्बनमधील किंग्समीड मैदानावर खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात संजू सॅमसनने स्फोटक खेळी केली. शानदार फॉर्ममध्ये असलेल्या संजूने पहिल्या टी-20 सामन्यात 47 चेंडूत शतक ठोकले. संजू सॅमसनच्या या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने चौकारांपेक्षा जास्त षटकार मारले.






संजू सॅमसनचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा टी-20 कारकिर्दीतील हा पहिलाच सामना होता आणि या सामन्यात त्याने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील हे त्याचे पहिले शतक होते. संजू सॅमसनने हे शतक ठोकताच इतिहास रचला. सलग दोन सामन्यात दोन शतके झळकावण्याचा पराक्रम संजू सॅमसनने केला आहे. शतक झळकावल्यानंतर सलग दोन T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतके झळकावणारा संजू सॅमसन पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. तो जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. ज्याने दोन सामन्यात दोन शतके झळकावली आहेत.






संजू सॅमसनने त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील पहिले शतक 12 ऑक्टोबर 2024 रोजी बांगलादेश विरुद्ध हैदराबाद येथे झळकावले होते, आता सुमारे एक महिन्याच्या आत त्याने या फॉरमॅटमधील कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. संजूने 34व्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आपले दुसरे शतक झळकावले. मात्र, त्याने ज्या प्रकारची खेळी खेळली त्यावरून त्याचे भारतीय टी-20 संघातील स्थान भविष्यातही पक्के होईल असे वाटते. या सामन्यात संजू सॅमसनने अवघ्या 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर त्याने 47 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. आपल्या शतकी खेळीत संजूने 9 षटकार आणि 7 चौकारही मारले. या सामन्यात संजूने सूर्यकुमार यादवसोबत दुसऱ्या विकेटसाठी 37 चेंडूत 66 धावांची शानदार भागीदारी केली. सलग दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय डावात संजू सॅमसनचे हे शतक होते आणि त्याने इतिहास रचला. 






दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीयाचे शतक



  • सुरेश रैना (2010)

  • रोहित शर्मा (2015)

  • सूर्यकुमार यादव (2023)

  • संजू सॅमसन (2024)


हे ही वाचा -


Ind vs Sa 1st T20 : सूर्या दादाची भीती! पठ्ठ्याने एक ओव्हरमध्ये टाकले 11 बॉल, पण शेवटी केली मोठी शिकार