Sai Sudarshan Catch IND vs WI 2nd Test : दिल्लीतील दुसऱ्या कसोटीत भारताच्या साई सुदर्शनने (Sai Sudarshan Catch) असा एक झेल घेतला की प्रेक्षक, सहकाऱ्यांसह स्वतः फलंदाजही काही क्षण स्तब्ध झाला. सर रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर वेस्ट इंडिजचा फलंदाज जॉन कॅम्पबेलने जोरदार स्वीप शॉट खेळला, पण नशीबाने चेंडू थेट शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या साई सुदर्शनकडे गेला. चेंडू जवळपास 150 किमी प्रतितास वेगाने येत होता. साईने कोणती प्रतिक्रिया देण्याच्या आतच तो त्याच्या हातावर लागला, मग हेल्मेटवर आपटला आणि पुन्हा हातात आला. 

Continues below advertisement






फलंदाजही स्तब्ध, झेल घेतल्यानंतर साई सुदर्शन मैदानाबाहेर 


हा झेल जितका अद्भुत होता तितकाच धोकादायकही. चेंडूच्या जबरदस्त वेगामुळे साईच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आणि त्याला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी मैदान सोडावे लागले. भारतीय संघ त्याच्यावर लक्ष ठेऊन असून दुखापती किती गंभीर आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. साई सुदर्शनचा हा झेल घेतलेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.




पहिल्या दिवशी साई सुदर्शनचं शतक हुकलं


पहिल्या दिवशी साई सुदर्शनने त्याच्या फलंदाजीचे कौशल्य दाखवले. जरी त्याचे शतक हुकले असले तरी त्याने अर्धशतक केले. त्याने 165 चेंडूत 87 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या डावात त्याने 12 चौकारही मारले. सुदर्शन त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक हुकले.


टीम इंडियाने उभारली मोठी धावसंख्या  


प्रथम फलंदाजी करताना, भारताने यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांच्या शतकांमुळे 134.2 षटकांत 518 धावांवर आपला डाव घोषित केला. जैस्वालने 258 चेंडूत 175 धावा केल्या, तर शुभमन गिलने 196 चेंडूत 129 धावांची नाबाद खेळी केली. नितीश रेड्डी यांनी 43 आणि ध्रुव जुरेल यांनी 44 धावा केल्या. प्रत्युत्तर वेस्ट इंडिजने फक्त 21 धावांवर आपला पहिला बळी गमावला.


हे ही वाचा -


Shubman Gill Century : थांबायचं नाव घेत नाही कर्णधार शुभमन गिलचं वादळ! वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना तोडलं, फोडलं अन् रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला