Sachin tendulkar Meets Bill Gates Latest News : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आज अब्जाधीश बिल गेट्स यांची भेट घेतली. या दिग्गजांच्या भेटीची सोशल मीडियावर चर्चा आहे. सचिन तेंडुलकर याने इन्स्टाग्रामवर भेटीचा फोटो पोस्ट केला आहे. सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांनी आज बिल गेट्स यांची भेट घेतली. 


सचिन तेंडुलकर याने आपल्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटलेय की,  'आपण सर्व अद्यापही विद्यार्थीच आहे. आज मुलांच्या शिक्षण आमि आरोग्य सेवा आणि दृष्टीकोणावर काम करण्याची संधी मिळाली. सचिन तेंडुलकर फांऊडेशन यावर नेहमीच काम करतो. एकमेंकाच्या विचारांची देवणघेवाण करण्याची संधी मिळाली. धन्यवाद बिल गेट्स' 


सचिन तेंडुलकर (Sachin tendulkar) याला क्रिकेटचा देव म्हटले जाते. सचिन तेंडुलकर याने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये अनेक विक्रमाला गवसणी घातली आहे. आजही अनेकांसाठी प्रेरणा आहे. सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर शतकांचा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याशिवाय त्याने धावांचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. सचिनच्या नावावर अनेक विक्रम आहेत. सचिन तेंडुलकर याला 'धावा'धीश म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आज सचिन तेंडुलकर याने अंजलीसोबत बिल गेट्स यांची भेट घेतली. सचिन तेंडुलकर फांऊडेशनमार्फत एका कार्यक्रमात या दोन दिगज्जांची भेट झाली. दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज भेटल्यामुळे चर्चेला उधाण आलेय. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सचिन तेंडुलकर याने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे. त्यासोबत त्याने खास पोस्टही केली आहे.


सचिन तेंडुलकर याने केलेली पोस्ट -










आणखी वाचा :


Sachin Tendulkar Statue : वानखेडे स्टेडियमवर उभारणार सचिन तेंडुलकरचा पुतळा, 50 व्या वाढदिवसानिमित्त MCA कडून अनोखं गिफ्ट 


Virat Kohli : सचिन की विराट? कोण आहे वनडे क्रिकेटचा किंग? सौरव गांगुली म्हणाला...