India vs Australia, 3rd test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी उद्यापासून (1 मार्च) खेळवला जाणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना जिंकून भारत मालिकेत विजयी आघाडी घेऊ शकतो. दरम्यान मालिकेतील हा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान आजचा सामना भारताला जिंकून मालिका खिशात घालता येईल तसंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील आपलं स्थानही पक्क करता येईल. यामुळे आजच्या महत्त्वाच्या सामन्यात मैदानाची खेळपट्टी (Pitch Report) कशी आहे अर्थात पिच रिपोर्ट जाणून घेऊ... 


सामना होणाऱ्या इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त आहे. ही खेळपट्टी उच्च धावसंख्येसाठी ओळखली जाते. तसंच याठिकाणी फिरकीपटूंनाही मदत मिळते. चेंडूला चांगला स्पिन मिळतो. वेगवान गोलंदाजांना विशेष मदत मिळताना दिसलेलं नाही. दरम्यान मैदानाच्या सीमा जवळ आहेत, त्यामुळे याठिकामी फलंदाजांना खास मदत होते. कसोटी सामन्याच्या बाबतीत, येथील खेळपट्टीवर खेळ नुकत्याच झालेल्या दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम सारखा होऊ शकतो. या मैदानावर आतापर्यंत एकूण दोन कसोटी सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये एका डावात 557/5 (डाव घोषित) अशी उच्च धावसंख्या झाली आहे. त्याच वेळी, मैदानावरील सर्वात कमी धावसंख्या 150 धावांची आहे. प्रथम फलंदाजी करताना, खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल राहते, परंतु सामना पुढे-पुढे जातो तशी ही खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी बनते. येथे पहिल्या डावात 353, दुसऱ्या डावात 396, तिसऱ्या डावात 214 आणि चौथ्या डावात 153 अशी सरासरी धावसंख्या आहे.


हवामान कसं असेल?


इंदूरचे हवामान 1 मार्च, बुधवार ते 5 मार्च, रविवार पर्यंत उबदार राहण्याची अपेक्षा आहे. कमाल तापमान 36 अंशांवर पोहोचेल. आणि सरासरी तापमान 35 अंश असेल. याशिवाय सामन्याच्या कोणत्याही दिवशी पाऊस पडण्याची शक्यता नाही. हवामान कोणत्याही प्रकारे सामन्यात अडथळा आणणार नाही.


पहिल्या दोन कसोटी सामन्यांत स्पिनर्सची धमाकेदार खेळी 


टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सध्याच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये स्पिनर्सचं वर्चस्व होतं. स्लो बॉलर्सनी एकूण 52 बळी घेतले आहेत. पण इंदूर कसोटीत फास्ट बॉलर्ससाठी उत्तम संधी आहे. गेल्यावेळी इंदूरमध्ये बांग्लादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात मयंक अग्रवालनं दुहेरी शतक झळकावलं होतं. तर मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी मिळून 14 विकेट घेतल्या होत्या. भारतीय संघाने तो कसोटी सामना अवघ्या 3 दिवसांत जिंकला होता.


हे देखील वाचा-