IND vs WI 2nd Test Match : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने वेस्ट इंडिजविरोधात दमदार शतकी खेळी केली. या शतकासह विराट कोहलीने खास विक्रमाला गवसणी घातली. आपल्या ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात विराट कोहलीने शतक ठोकले. असा पराक्रम करणारा विराट कोहली पहिला आणि एकमेव खेळाडू ठरलाय. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, धोनी, रिकी पाँटिंग, संगाकारा यांनाही हा पराक्रम करता आला नाही. विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरोधात शतक झळकावत अनेक विक्रम केले आहेत. विराट कोहलीचे कसोटीतील २९ वे आणि आंतरराष्ट्रीय सामन्यातील ७६ वे शतक होते. विराट कोहलीच्या शतकानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर याने विराटसाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्याशिवाय पत्नी अनुष्का शर्मानेही विराटसाठी खास पोस्ट केली आहे. या पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.
वेस्ट इंडिजविरोधात विराट कोहलीने २०६ चेंडूत १२१ धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने ११ चौकार लगावले. विराट कोहलीने सुरुवातीपासून संयमी फलंदाजी करत धावसंख्येला आकार दिला. हे विराट कोहलीचे कसोटीतील २९ वे तर आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७६ वे शतक होय. ५०० व्या कसोटीत शतक झळकावण्याचा विक्रम विराट कोहलीने केलाय. या शतकी खेळीनंतर सोशल मीडियावर विराटचीच चर्चा सुरु आहे.
विराट कोहलीची दमदार कामगिरी
विराट कोहलीने शतक झळकावत खास विक्रम केला आहे. विदेशात सर्वाधिक शतक ठोकणाऱ्या भारतीय फलंदाजामध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. सचिन तेंडुलकरपेक्षा फक्त एक शतक मागे राहिला आहे. विराट कोहलीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये विदेशात 28 शतके ठोकले आहेत. सचिन तेंडुलकरने विदेशात 29 शतके ठोकले आहेत. त्याशिवाय वेस्ट इंडिजविरोधात सर्वाधिक शतके लगावण्याच्या बाबतीत एबी डिव्हिलिअर्सला मागे टाकले आहे. याबाबत गावसकरांच्या एक शतक मागे आहे. सुनील गावसकर यांनी वेस्ट इंडिजविरोधात १३ शतके ठोकली आहेत. विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरोधात १२ शतके लगावली आहेत. जॅक कॅलिसनेही विडिंजविरोधात १२ शतके झळकावली आहेत. एबी डिव्हिलिअर्स याने ११ शतकांना ठोकली आहेत.