Unwanted Record: केपटाऊन (Cape Town) येथे खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील निर्णायक सामन्यात टीम इंडियाच्या (Team India) नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेलाय. या सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियानं 223 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ पहिल्या डावात केवळ 210 धावाच करू शकला आणि भारताला 13 धावांची आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या डावात टीम इंडियानं 198 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर 212 धावांचे लक्ष्य ठेवलं


केपटाऊन कसोटी सामन्यात टीम इंडियाचे सर्व फलंदाज दोन्ही डावात झेलबाद झाले आहेत. कसोटी क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एखा संघाचे सर्व फलंदाज दोन्ही डावात झेलबाद ढाले आहेत. याआधी पाच वेळा एका संघाचे 19 खेळाडू झेलबाद झाल्याची नोंद आहे. परंतु, एका संघाचे 20 फलंदाज झेलबाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 


भारताने दिलेल्या 212 धावांच्या लक्ष्याला पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं तिसऱ्या दिवसापर्यंत 2 बाद 101 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर बाद झाल्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. तिसऱ्या दिवसापर्यंत कीगन पीटरसन 61 चेंडूत सात चौकारांच्या मदतीनं नाबाद 48 धावा करून परतला. तर, डीन एल्गरनं 96 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीनं 30 धावा केल्या. याशिवाय, दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्कम 22 चेंडूंत चार चौकारांच्या मदतीनं 16 धावा करून बाद झाला. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 111 धावांची गरज आहेत. भारतासाठी आतापर्यंत दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामीला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली आहे. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha