Road Safety World Series 2022: ऑस्ट्रेलिया लीजेंड्स आणि वेस्ट इंडीज लीजेंड्स यांच्यात रविवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज 2022 चा चौथ्या सामना खेळला गेला. या सामन्यात शेन वॉटसन (88) आणि अॅलेक्स डूलन (57) यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलिया लीजेंड्सनं 8 विकेट्स राखून वेस्ट इंडीज लीजेंड्सचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज लीजेंड्सनं सहा विकेट्स गमावून 178 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया लीजेंड्सनं आक्रमक फलंदाजी करत 15.1 व्या षटकातच सामना जिंकला. ऑस्ट्रेलिया लिजेंड्सचा चार सामन्यातील हा दुसरा विजय आहे. तर वेस्ट इंडीज लीजेंड्सचा पाच सामन्यातील पहिला पराभव आहे.


या सामन्यात शेन वॉटसननं जुन्या अंदाजात फलंदाजी केली. शेन वॉटसननं 50 चेंडूत 5 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीनं 88 धावांची मॅच विनिंग खेळी केली. तर, अलेक्स डूलननं 30 चेंडूत 57 धावांची धमाकेदार खेळी केली, ज्यात दोन चौकार आणि सहा षटकारांचा समावेश आहे. दोघांमध्ये पहिल्या विकेट्ससाठी 131 धावांची भागेदारी झाली. तर, ऑस्ट्रेलिया लीजेंड्ससाठी बेन डंकनं नाबाद 22 धावांचं योगदान दिलंय.


ट्वीट-






 


या सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीज लीजेंड्सच्या संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत सहा विकेट्स गमावून ऑस्ट्रेलिया लीजेंड्ससमोर 178 धावांचं लक्ष्य ठेवलं. वेस्ट इंडीज लीजेंड्ससाठी ड्वेन स्मिथनं 33 चेंडूत 65 धावांची तडाखेबाज खेळी केली. त्याच्या व्यतिरिक्त किक एडवर्ड्सनं 46 आणि नरसिंह डोनारायणनं 28 धावांचं योगदान दिलं.  ऑस्ट्रेलिया लीजेंड्ससाठी ब्रिस मॅक्गेननं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, डिर्क नैन्सनं खात्यात दोन विकेट्स जमा झाल्या. 



हे देखील वाचा-