एक्स्प्लोर

RCB vs MI IPL 2026 : शेवटच्या 1 चेंडू... 2 धावा... अन् मुंबईचं स्वप्न चक्काचूर! RCBने अखेरच्या बॉलवर फिरवला संपूर्ण सामना, मुंबई इंडियन्स IPL 2026 मधून बाहेर

Royal Challengers Bengaluru vs Mumbai Indians : आयपीएल 2026 च्या 54व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून अखेरच्या चेंडूवर 2 गडी राखून पराभव पत्करावा लागला.

Royal Challengers Bengaluru vs Mumbai Indians : आयपीएल 2026 च्या 54व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून अखेरच्या चेंडूवर 2 गडी राखून पराभव पत्करावा लागला. या पराभवासह मुंबईच्या प्लेऑफच्या आशाही जवळपास संपुष्टात आल्या आहेत. शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या थरारक सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 166 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची अवस्था एका क्षणी बिकट झाली होती, पण शेवटच्या षटकात सामन्याने जबरदस्त कलाटणी घेतली.

शेवटच्या षटकात आरसीबीचा विजय

विजयासाठी अखेरच्या 6 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज असताना राज बावाने 5 अतिरिक्त धावा दिल्या आणि सामना पूर्णपणे फिरला. शेवटच्या चेंडूवर 2 धावांची आवश्यकता असताना रसिक सलामने शांतपणे दोन धावा पूर्ण करत आरसीबीला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. या रोमांचक विजयासह आरसीबीने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले, तर मुंबई इंडियन्ससाठी हा पराभव हंगाम संपवणारा ठरला. आरसीबीने कृणाल पांड्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित षटकांत आठ गडी गमावून 167 धावा केल्या आणि सामना जिंकला. मुंबईकडून कॉर्बिन बॉशने चार आणि दीपक चहरने दोन बळी घेतले, तर गझनफर आणि राज बावा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

भुवीचा रायपूरमध्ये कहर! एका ओव्हरमध्ये रोहित, सूर्या आणि रिकेल्टन OUT

मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांनी केली. रोहितने आक्रमक सुरुवात केली होती, मात्र डावाच्या तिसऱ्याच षटकात भुवनेश्वर कुमारने मुंबईला सलग मोठे धक्के देत सामना फिरवला. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर भुवीने रायन रिकेल्टनला 2 धावांवर बाद केले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर रोहित शर्माला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रोहितने 10 चेंडूत 22 धावा केल्या. त्यानंतर षटकाच्या अखेरच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवलाही शून्यावर बाद करत भुवीने मुंबईची अवस्था बिकट केली.

तिलक वर्माने संघाची धुरा घेतली हाती अन्....

यानंतर नमनधीर आणि तिलक वर्मा यांनी चौथ्या विकेटसाठी 82 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. मात्र ही जोडी रशिख सलामने फोडली. त्याने नमनधीरला बाद केले. नमनधीरने 32 चेंडूत 47 धावांची खेळी केली. त्यानंतर रोमारियो शेफर्डने विल जॅक्सला 10 धावांवर बाद केले. तिलक वर्माने मात्र एकहाती झुंज देत मुंबईसाठी अर्धशतक झळकावले. तिलक वर्माने 42 चेंडूत 57 धावा केल्या. त्याच्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. याशिवाय राज बावाने 16 धावा केल्या, मात्र त्याला जोश हेझलवूडने बाद केले. कॉर्बिन बॉश 5 धावा करून बाद झाला, तर दीपक चाहर 1 धावेवर नाबाद राहिला. अशाप्रकारे मुंबई इंडियन्सने 7 विकेट गमावत 166 धावांपर्यंत मजल मारली.

हे ही वाचा -

CSK vs LSG IPL 2026 : आयपीएल पुन्हा गालबोट लागलंच.... BCCIने सांगून पण नियम धाब्यावर, CSK vs LSG सामन्यात डगआउटमध्ये फोनचा वापर, नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Embed widget