Rohit unlikely to play T20Is in near future : अहमदाबादच्या रणांगणात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर रोहित शर्माबाबत मोठी माहिती समोर आली आहे. हिटमॅन रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटला लवकरच रामराम ठोकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वनडे विश्वचषकापूर्वीच रोहित शर्माने टी20 क्रिकेटमधील आपल्या भविष्याबाबत बीसीसीआयसोबत चर्चा केल्याचं समोर आलेय. बीसीसीआयमधील सुत्रांनी याबाबत पीटीआयला माहिती दिली. 
 
नोव्हेंबर 2022 मध्ये भारतीय संघाचे टी20 मधील आव्हान संपल्यापासून रोहित शर्माने एकही टी20 सामना खेळला नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी20 सामने खेळले आहेत. रोहित शर्माने 148 टी20 सामन्यात 3853 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये चार शतकांचा समावेश आहे. रोहित शर्माने टी20 क्रिकेटमध्ये थांबण्याचा निर्णय घेतल्याचं समजतेय. बीसीसीआयमधील सूत्राने रोहित शर्माच्या निर्णायाबद्दल पीटीआयला सांगितले. तो म्हणाला की, वनडे विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी रोहित शर्माने गेल्यावर्षभरात एकही टी20 सामना खेळला नाही. रोहित शर्माने याबाबत निवड समितीचे अध्यक्ष अजीत आगरकर यांच्याशी दीर्घ चर्चा केली. रोहित शर्माने स्वत: टी 20 पासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. 


रोहित शर्माशिवाय भारताकडे शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, ईशान किशन आणि ऋतुराद गायकवाड ये चार सलामीचे फलंदाज आहे. या चारही जणांनी आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. या युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली नाही, तर बीसीसीआय रोहित शर्माला निर्णय बदलण्याची विनंती करु शकते. करिअयरच्या या टप्प्यावर, रोहितला टी20 पासून दूर जायचेय, कारण, तो उर्वरित कारकिर्दीतमध्ये दुखापतीला दूर ठेवण्याचा विचार करतो.  तिन्ही फॉरमॅटमध्ये आणि दरवर्षी आयपीएलमध्ये खेळणे रोहित शर्मा अशक्य होईल. त्यामुळे टी 20 क्रिकेटमध्ये त्याने थांबण्याचा निर्णय घेतलाय.


डिसेंबर 2023 ते मार्च 2024 पर्यंत टीम इंडिया सात कसोटी सामने खेळणार आहे. यामध्ये रोहित शर्मा जास्तीत जास्त कसोटी खेळण्याचा विचार करत असेल. भारताला 2025 मध्ये कसोटी अजिंक्यपदाच्या फायनलमध्ये पोहचायचे आहे. त्यामध्ये रोहित शर्माचा वाटा महत्वाचा आहे. 2019 मध्ये भारतासाठी कसोटीमध्ये डावाची सुरुवात केल्यापासून, खेळाच्या या पारंपारिक स्वरूपातील रोहितचा फॉर्म उत्कृष्ट आहे. सर्व काही व्यवस्थित राहिल्यास जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे तिन्ही गोलंदाज दक्षिण आफ्रिकेतील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत एकत्र गोलंदाजी करतील.  


पुढच्या वर्षी इंग्लंडविरोधात होणाऱ्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी या तिन्ही गोलंदाजांना रोटेशन पॉलिसीनुसार खेळवण्यात येईल. जेणेकरुन दुखापतीचा सामना करण्याची गरज भासणार आहे. बुमराह तंदुरुस्त असून त्याने वनडे विश्वचषकात दमदार कामगिरी केली आहे. बुमराह कसोटी सामने खेळण्यासाठी तयार आहे. जर सर्व काही सुरळीत झाले तर बुमराह टी-20 वर्ल्ड कपमध्येही नक्कीच खेळेल.