Rohit Sharma On Mumbai Pollution : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील (Mumbai) हवेची गुणवत्ता ढासळल्याचे चित्र आहे. मुंबईतील वाढतं प्रदूषण हे अत्यंत चिंताजनक असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मंगळवारी म्हटले होते. यावर आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यानेही मत व्यक्त केलेय. विश्वचषकातील श्रीलंकेविरोधातील सामना खेळण्यासाठी रोहित शर्मा आणि टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल झाली. श्रीलंकेविरोधातील सामन्याचा सरावही त्यांनी सुरु केला. पण त्याआधी रोहित शर्मा याने केलेल्या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. रोहित शर्माने मुंबईत उतरल्यानंतर एक फोटो पोस्ट केला होता. विमानातून काढलेल्या या फोटोमध्ये मुंबईतील प्रदुर्षण स्पष्ट दिसत होते. मुंबईवर प्रदुषणाचा मोठा थर असल्याचे या फोटोत स्पष्ट दिसतेय. प्रदुर्षणाचा फोटो पोस्ट करत मुंबई, हे काय झालेय.. असा सवाल रोहित शर्माने उपस्थित केलाय. रोहित शर्माच्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, मुंबईतील हवेच्या दर्जाबद्दल चिंता व्यक्त करणारा रोहित शर्मा पहिला क्रिकेटपटू नाही. त्याआधी इंग्लंडच्या जो रुटनंदेखील हवेच्या दर्जाबद्दल चिंता बोलून दाखवली होती.


भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये दोन नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडिअमवर सामना होणार आहे. भारतीय संघाने सलग सहा सामन्यात विजय मिळलाय. आता सातव्या विजयासाठी उद्या मैदानात उतरणार आहे. त्याआधीच रोहित शर्माने हवा प्रदुर्षणाची केलेली पोस्ट चर्चेत आहे. रोहितने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर विमानातून काढलेला फोटो  पोस्ट केलाय, ज्यामध्ये हवेची गुणवत्ता किती वाईट होती हे हायलाइट केले. रोहित शर्माने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले, 'मुंबई, काय झाले?' आणि विमानातील एक छायाचित्रही शेअर केले. त्यासोबत त्यानं मास्क घातलेले इमोजी शेअर केला आहे. या फोटोमध्ये मुंबई शहरावर पसरलेलं धुरकं दिसत आहे. धुरकं दाटून आल्यानं खाली असलेलं शहर दिसत नाही.


रोहितची नेमकी पोस्ट काय ?










मागील काही दिवसांपासून मुंबईचा श्वास रोखलाय ?
मागील काही दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरल्याचे दिसतेय. मागील 24 तासात मुंबईसह राज्यातील अनेक शहरांचा हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक श्रेणीतून मॉडरेट  (मध्यम) श्रेणीत   गेला आहे.  धुलिकणांच्या मात्रेत वाढ झाल्याचं चित्र आहे. पूर्वेकडून येणारे वारे, वाऱ्यांची कमी गती, तापमानात होणारी घट आणि डस्ट लिफ्टींगमुळे हवा गुणवत्ता बिघडली आहे. मुंबई महापालिकेकडून हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात झालीय  त्यानंतर मुंबईतील हवेच्या निर्देशांकात सुधारणा झाल्याचं चित्र  दिसत आहे.