Rohit Sharma On Ind vs Aus: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या एकदिवसीय आणि टी-20 संघांची (Ind vs Aus) घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीचा (Virat Kohli) संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र रोहित शर्माच्या जागी आता शुभमन गिलला (Shubhman Gill) भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. बीसीसीआयने रोहित शर्माला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर सर्वांना आर्श्चयाचा धक्का बसला. आता रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी एक मोठं विधान केलं आहे.
मुंबईत काल CEAT क्रिकेट पुरस्कार 2025 आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात रोहित शर्माही शामिला झाला होता. रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधार म्हणून त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल रोहित शर्माला पुरस्कार देण्यात आला. रोहित शर्मा आता एकदिवसीय संघाचा कर्णधार नसला तरी, क्रिकेट जगत त्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या कामगिरीचे कौतुक करत आहे. 2025 चा चॅम्पियन्स ट्रॉफी विजय भारतीय क्रिकेट इतिहासातील एक संस्मरणीय क्षण ठरला. या विजयाची दखल घेत रोहितला 'विशेष सन्मान' देण्यात आला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी रोहित शर्मा काय म्हणाला? (Rohit Sharma On Ind vs Aus ODI)
रोहित शर्माला ऑस्ट्रेलियादौऱ्याबाबात विचारले असता मला तो (ऑस्ट्रेलिया) संघ आवडतो आणि मला त्यांच्यासोबत खेळायला आवडते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना नेहमी एक वेगळे आव्हान असते. आम्ही तिथे (ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर) जाऊ आणि जे करायला हवे ते करू...निकाल आमच्या बाजूने लागेल, असं रोहित शर्माने सांगितले. आम्ही सर्वजण अनेक वर्षांपासून या प्रवासात आहोत. ही एक-दोन वर्षांची प्रक्रिया नव्हती. ही एक दीर्घकालीन प्रयत्न आहे. आम्ही अनेक वेळा ट्रॉफी जिंकण्याच्या जवळ पोहोचलो पण ते शक्य झाले नाही. मग आम्ही सर्वांनी ठरवले की आम्हाला काहीतरी वेगळे करावे लागेल, असं रोहित शर्मा म्हणाला.
वनडे मालिकेचं वेळापत्रक- (Ind vs Aus ODI Schedule)
- 19 ऑक्टोबर - पहिली वनडे (पर्थ)
- 23 ऑक्टोबर- दुसरी वनडे (एडिलेड)
- 25 ऑक्टोबर- तिसरी वनडे (सिडनी)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ- (Team India ODI Squad vs Australia)
शुभमन गिल- कर्णधार, श्रेयस अय्यर- उपकर्णधार, विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठीचा भारतीय संघ- (Team India T20 Squad vs Australia)
सूर्यकुमार यादव- कर्णधार, अभिषेक शर्मा, शुभमन गिल- उपकर्णधार, तिलक वर्मा,नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीकरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.