India vs New Zealand 3rd Test : न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची बॅट शांत राहिली आहे. हा सामना त्याच्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत असूनही हिटमॅनला मोठी खेळी खेळता आली नाही. भारताच्या पहिल्या डावात त्याला केवळ 18 धावा करता आल्या. या सामन्यात त्याच्या फलंदाजीचा आनंद लुटण्याची संधी चाहत्यांना मिळाली नसली तरी हिटमॅनचे कर्णधारपद निश्चितच चांगले राहिले आहे.
त्याची रणनीती आणि घेतलेले निर्णय न्यूझीलंडच्या पहिल्या डावात योग्य ठरले. त्यामुळेच पाहुण्या संघाला पहिल्या डावात 235 धावांत रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित ऋषभ पंतवर रागाने ओरडताना दिसत आहे. मात्र, रोहितला कशाचा राग आहे हे कोणालाच माहीत नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ कर्णधार रोहित शर्माचा ऋषभ पंतवर ओरडतानाचा ड्रेसिंग रूममधला आहे. रोहितला पंतचा इतका राग का आला हे माहीत नाही. रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसाचा असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडिओमध्ये एकीकडे रोहित पंतवर चिडत असताना दुसरीकडे पंत स्पष्टीकरण देताना दिसत आहे. मात्र, व्हिडिओमध्ये पंत हाताची घडी अन् मान खाली घालून दिसत आहे.
ऋषभ पंतने मुंबई कसोटीत बॅटने अप्रतिम कामगिरी केली हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्याने 59 चेंडूंत 60 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली, ज्यात आठ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. शुभमन गिलसोबत त्याने पाचव्या विकेटसाठी 96 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. भारताने पहिल्या डावात 268 धावा केल्या आणि 33 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने 9 गडी गमावून 171 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडे 143 धावांची आघाडी आहे. पण ही आघाडी खूपच कमी आहे.
दुसऱ्या दिवशी भारताकडून गोलंदाजी करताना रवींद्र जडेजाने 4 आणि आर अश्विनने 3 बळी घेतले. याशिवाय आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदरने 1-1 बळी घेतला. आता तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात किवी संघाला लवकर बाद केल्यानंतर टीम इंडियाला विजय मिळवायचा आहे.
हे ही वाचा -