India vs New Zealand 3rd Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मुंबईतील वानखेडेवर सुरू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पहिल्या डावात 235 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 263 धावांवर संपला. भारताकडे 28 धावांची आघाडी होती. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा दुसरा डाव 174 धावांवर आटोपला. मुंबई कसोटी जिंकण्यासाठी भारतासमोर 147 धावांचे लक्ष्य आहे.
न्यूझीलंडचा दुसरा डाव 174 धावांवर आटोपला
किवींनी रविवारी नऊ बाद 171 धावांवरून सुरुवात केली आणि तीन धावांनंतर शेवटची विकेट पडली. शेवटची विकेट म्हणून जडेजाने एजाज पटेलला झेलबाद केले आणि त्याला आठ धावा करता आल्या. विल्यम ओरूर्के दोन धावा करून नाबाद राहिला. हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिका चांगल्या पद्धतीने संपवायची आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय खेळाडूंचा हा आत्मविश्वास वाढवणारा विजय असेल.
भारतीय संघाला मुंबई कसोटी जिंकण्याची मोठी संधी आहे. मालिकेत लागोपाठ दोन पराभवांचा सामना केल्यानंतर टीम इंडिया आता शेवटचा सामना जिंकण्याच्या जवळ आहे. रवींद्र जडेजाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात न्यूझीलंडला 174 धावांत आटोपले.
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत सलग दोन सामने गमावल्यानंतर भारताला आता शेवटचा सामना जिंकण्याची संधी आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रवींद्र जडेजाच्या 5 बळी आणि वॉशिंग्टन सुंदरच्या 4 विकेट्सच्या जोरावर भारताने पहिल्या डावात न्यूझीलंडला 235 धावांत गुंडाळले. यानंतर शुभमन गिलच्या 90 धावा आणि ऋषभ पंतच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर आम्ही 263 धावा केल्या आणि 28 धावांची आघाडी घेतली. सामन्याच्या दुसऱ्या डावात जडेजाने पुन्हा एकदा आपल्या कौशल्याचे दर्शन घडवत 5 विकेट घेतल्या. शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात न्यूझीलंडला 174 धावांत आटोपले.
भारतासमोर धावांचे लक्ष्य
मुंबई कसोटी जिंकण्यासाठी न्यूझीलंडने भारतासमोर 147 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या डावात फलंदाजीची सलामी देणाऱ्या रवींद्र जडेजाने दुसऱ्या डावातही किलर गोलंदाजी केली. त्याला आर अश्विनने दुसऱ्या टोकाला साथ दिली. या दोघांनी मिळून भारताच्या विजयाच्या आशा उंचावल्या आहेत.
हे ही वाचा -