India Squad For 2025 Champions Trophy : टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. शनिवारी, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. रोहितने या स्पर्धेसाठी एक खास फॉर्म्युला तयार केला आहे. शनिवारी रोहित शर्मा त्याच्या निळ्या लॅम्बोर्गिनी कार क्रमांक 264 मध्ये बीसीसीआय कार्यालयात पोहोचला. यानंतर एक बैठक झाली. मग आगरकर आणि रोहित पत्रकार परिषदेसाठी आले. सर्वप्रथम चॅम्पियन्स ट्रॉफी संघाची घोषणा करण्यात आली. तसेच इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली.


युवा फलंदाज शुभमन गिलला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. त्याच वेळी, मोहम्मद सिराजला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे आणि त्याच्या जागी अर्शदीप सिंगला संधी देण्यात आली आहे. तसेच, मोहम्मद शमीचेही संघात पुनरागमन झाले आहे. रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 7,4,4 चा फॉर्म्युला तयार केला आहे.


या फॉर्म्युचा अर्थ 7 फलंदाज, 4 अष्टपैलू खेळाडू आणि 4 गोलंदाज असा होतो. अशाप्रकारे, रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 15 खेळाडूंची निवड केली आहे. संघाच्या घोषणेसोबतच या पत्रकार परिषदेत इतर अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहित कसोटी क्रिकेट खेळत आहे आणि पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला जात आहे. हिटमनने असेही म्हटले की तो रणजी ट्रॉफी देखील खेळणार आहे.


या 7 फलंदाजांची 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड झाली आहे. त्यात रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांचा समावेश आहे. त्यानंतर रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे चार अष्टपैलू खेळाडू आहेत. या चार गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे.






2025 चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.


हे ही वाचा -


India Women vs West Indies Women : 26 चेंडूत खेळ खल्लास, भारताच्या वाघीणींच्या जबड्यात वेस्ट इंडिज गुदमरला, टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये धुव्वा!