कोलंबो : तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेनंतर भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन सामन्यांची सुरु झाली आहे. रोहित शर्मा या मालिकेत भारताचं (Team India) नेतृत्त्व करत आहे. श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता श्रीलंकेची फलंदाजी सुरु असताना रोहित शर्मानं (Rohit Sharma) खास त्याच्या स्टाईलमध्ये वॉशिंग्टन सुंदरची (Washington Sundar) फिरकी घेतली. मैदानात जे घडलं त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 
 
भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे पहिली वनडे सुरु आहे. या वनडे मॅचमध्ये  रोहित शर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यात एक किस्सा घडला. रोहित शर्मानं वॉशिंग्टन सुंदरला 29  वी ओव्हर दिली होती. या ओव्हरमध्ये श्रीलंकेचा दुनिथ वेल्लागे खेळत होता. त्यानं 7 धावा केल्या होत्या. वॉशिंग्टन सुंदरच्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर वेल्लागे विरुद्ध एलबीडब्ल्यूची अपिल करण्यात आली. यावेळी विकेटकीपर केएल राहुलनं जोरदार अपिल केलं. त्या तुलनेत वॉशिंग्टन सुंदरनं जोरदार अपिल केलं नाही. पंच दाद देत नाहीत हे लक्षात येताच सुंदरनं रोहित शर्माकडे पाहिलं. त्यावेळी बॉल पॅडला लागला की बॅटला लागून गेला याचा अंदाज येत नव्हता. रोहित शर्मा त्यावेळी स्लिपमध्ये उभा होता. यावेळी त्यानं वॉशिंग्टन सुंदरची फिरकी घेतली. 


रोहित शर्मा डीआरएस घेईल या आशेनं वॉशिंग्टन सुंदर त्याच्याकडे पाहत होता. यावेळी रोहित शर्मा जे बोलला ते स्टम्पमध्ये असलेल्या माईकमुळं रेकॉर्ड झालं. यामध्ये रोहित शर्मा म्हणाला की "काय तू मला सांगणार, मला काय पाहतोय, तुझ्यासाठी सर्व गोष्टी मी करु का? या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं. 




रोहित शर्माचं अर्धशतक


रोहित शर्माने गेल्यावर्षीचा वनडे वर्ल्ड कप आणि यंदाचा टी 20 वर्ल्ड कपमध्ये ज्या प्रकारे भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली होती. त्या प्रमाणं आज देखील त्यानं आक्रमक फलंदाजी केली. रोहित शर्मानं शेवटची वनडे मॅच 2023 च्या वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये खेळली होती. जवळपास नऊ महिन्यांनतर रोहित शर्मा वनडे मॅच खेळला. यामध्ये त्यानं 47  बॉलमध्ये 58  धावा केल्या. रोहित शर्मानं 7 चौकार आणि 3 षटकार मारले.  


टीम इंडियाची  प्लेइंग इलेव्हन-


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज


श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन-
पथुन निशांका, अविश्का फर्नांडो, कुशल मेंडिस (यष्टीरक्षक), सादिरा समराविक्रम, चारिथ असलांका (कर्णधार), झेनिथ लियानगे, वानिंदु हसरंगा, डुनिथ वेलागे, अकिला धनंजया, असिश्था फर्नांडो, मोहम्मद शिराज


संबंधित बातम्या :


KL Rahul : अम्पायरनं निर्णय दिला, के. एल. राहुलला आयपीएलच्या नियमाची आठवण, रोहित शर्माकडे धावत गेला अन् म्हणाला... व्हिडीओ व्हायरल


भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला रोखलं, निसांका- वेलागेच्या अर्धशतकानं डाव सावरला, रोहित सेनेपुढं किती धावांचं आव्हान?