Virat Kohli Rohit Sharma Ranji Trophy 2024 : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यातील पराभवामुळे चाहते प्रचंड संतापले आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही कसोटीत फलंदाजीत सपशेल फ्लॉप ठरले. रोहित प्रत्येकी एका धावेसाठी तळमळत होता, तर कोहलीही मिचेल सँटनरविरुद्ध अडचणीत दिसत होता. टीम इंडियाच्या या दोन सर्वात अनुभवी फलंदाजांच्या चाहत्यांनी आता चांगलाच क्लास लावला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी रोहित-कोहलीला थेट प्रश्न केला आहे की, ते आंतरराष्ट्रीय सामन्यांपूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सराव का करत नाहीत.
कोहली-रोहितवर चाहते संतापले
आधी बंगळुरू आणि नंतर पुणे. दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, दोन्ही स्टार फलंदाजांनी चाहत्यांना नाराज केले. पुणे कसोटीच्या पहिल्या डावात रोहितला खातेही उघडता आले नाही, तर दुसऱ्या डावात हिटमॅन केवळ 8 धावा करू शकला. कोहली पहिल्या डावात केवळ एक धावा काढून आऊट झााला. कसा तरी विराट दुसऱ्या डावात 17 धावा करण्यात यशस्वी ठरला.
सलग दोन सामने फ्लॉप झाल्यानंतर चाहत्यांनी कोहली-रोहितवर जोरदार टीका केली. या दोन दिग्गज फलंदाजांना देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळण्याबाबत चाहत्यांनी थेट प्रश्न विचारला आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की, 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर वयाच्या 40 व्या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये सहभागी होऊ शकतो, तर रोहित-कोहली का नाही?
देशांतर्गत क्रिकेटमध्ये कोहली-रोहित कधी खेळले?
विराट कोहली आणि रोहित शर्मा देशांतर्गत क्रिकेट खेळून बराच काळ लोटला आहे. कोहलीने शेवटचा रणजी सामना 2012 मध्ये खेळला होता. तर सचिन तेंडुलकरने शेवटचा रणजी सामना 2013 मध्ये खेळला होता. म्हणजे सचिनच्या निवृत्तीपूर्वी गेल्या वर्षी भारताच्या या प्रसिद्ध देशांतर्गत स्पर्धेत कोहली शेवटचा दिसला होता. दुसरीकडे, रोहित शर्मा शेवटचा 2016 मध्ये डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळताना दिसला होता. कोहलीला देशांतर्गत क्रिकेट खेळून 12 वर्षे झाली आहेत, तर भारतीय कर्णधारही 8 वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेट खेळलेला नाही.
हे ही वाचा -
Virat Kohli : स्पिनर्ससमोर अडखळतोय, आता विराटने....! Dinesh Karthik च्या सल्ल्याने सारेच चक्रावले