MS Dhoni IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच 2025 मध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएल हंगामापूर्वी मेगा प्लेयर लिलाव आयोजित केला जाणार आहे, अशा स्थितीत सर्व चाहत्यांच्या नजरा खेळाडूवर खिळल्या आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या रिटेन केलेल्या खेळाडूंकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे, त्यात एमएस धोनी खेळणार की नाही हे स्पष्ट होईल. 






दरम्यान, एमएस धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो प्रथमच थाला संदर्भात व्हायरल मेम व्हिडिओला प्रतिसाद देताना दिसला आहे. त्या ट्रेंडचा अर्थ धोनीच्या 7 नंबरच्या जर्सीशी संबंधित आहे.






जेव्हा एमएस धोनीला एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये 'थाला फॉर अ रीजन' म्हणजे काय? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने उत्तर दिले की, ते कुठून आले हे मला माहित नाही, कश्यासाठी बोलतात ही कारण देखील माहित नाही. मला असे वाटते की हे मला माझ्या चाहत्यांनी दिले आहे आणि मी निश्चितपणे म्हणू शकतो की माझे चाहते अद्भुत आहेत.  






आयपीएलचा पहिला सीझन 2008 मध्ये खेळला गेला होता, त्यानंतर धोनी चेन्नई सुपर किंग्जचा खूप महत्त्वाचा भाग होता. धोनीच्या नेतृत्वाखाली CSK संघाने 5 वेळा IPL ट्रॉफी जिंकली आहे. जर आपण धोनीबद्दल बोललो तर, चेन्नईचे चाहते त्याला थाला म्हणतात आणि प्रत्येकजण त्याला खेळताना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतो. मात्र, तो आगामी हंगामात खेळणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत बातमी समोर आलेली नाही.






केवळ 5 खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी


लिलावापूर्वीच्या नवीन नियमांनुसार, सर्व संघांना सध्याच्या संघातून 5 खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी आहे, ज्यांना त्यांना कायम ठेवायचे आहे. त्यांची किंमत खालीलप्रमाणे असेल. पहिला रिटेंशन 18 कोटी रुपये, दुसरा 14 कोटी रुपये, तिसरा 11 कोटी रुपये, चौथा पुन्हा 18 कोटी रुपये आणि पाचवा 14 कोटी रुपये आहे. याशिवाय आरटीएम कार्डची (राईट टू मॅच) सुविधाही असेल.


हे ही वाचा -


Virat Kohli : स्पिनर्ससमोर अडखळतोय, आता विराटने....! Dinesh Karthik च्या सल्ल्याने सारेच चक्रावले


कसोटी मालिका गमवल्यानंतर टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल; 'हा' खेळाडू बनला नवा कोच, गौतम गंभीर सुट्टीवर