Rohit Sharma and Jay Shah Visit Siddhivinayak Temple : भारताच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीआय सचिव जय शाह हे सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहोचले आहेत. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. जय शाह आणि रोहितने भारताने जिंकलेली टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफीही सिद्धिविनायकाच्या चरणी नेली आहे. विशेष म्हणजे या ट्रॉफीला पुष्पहार घालून पूजनही करण्यात आले.






29 जून रोजी टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला आणि इतिहासात दुसऱ्यांदा क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये विश्वविजेतेपद पटकावले. त्या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीनेही टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दुसऱ्याच दिवशी रवींद्र जडेजानेही या फॉरमॅटला अलविदा केला.






रोहित आणि कंपनीसमोर मोठे आव्हान


पुढील काही महिने भारतीय संघासाठी खूप व्यस्त असणार आहेत. टीम इंडियाला सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी आणि 3 टी-20 सामने खेळायचे आहेत. त्यानंतर भारत तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचे यजमानपद भूषवणार आहे. सध्या बहुप्रतिक्षित सामना बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पुढील वर्षाची सुरुवातही टीम इंडियासाठी सुखकर होणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारताला इंग्लंडचे यजमानपद भूषवायचे आहे.





संबंधित बातमी :


Hasin Jahan on Sourav Ganguly : मोहम्मद शमीची पत्नी सौरव गांगुलीवर संतापली, म्हणाली, यांच्यासारख्याना स्त्री केवळ मनोरंजन आणि...

Yashasvi Jaiswal : जैस्वालचा संपणार नाही वनडेतला वनवास? चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळणार नाही संधी; स्टार खेळाडूने सांगितले कारण

फक्त 2 चेंडूत खेळ खल्लास! 'अरे, त्याला झिम्बाब्वेविरुद्ध खेळवा...' बाबर आझम होतोय ट्रोल

Jaydev Unadkat : 400 हून अधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाने घेतला मोठा निर्णय, आता 'या' देशात खेळणार क्रिकेट