Rohit Sharma : पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क ही जगातील सर्वात भेदक गोलंदाजी रोहित शर्माने फोडून काढली. रोहित शर्मापुढे ऑस्ट्रेलियाची बलाढ्य गोलंदाजी कमकुवत दिसली. रोहित शर्माने 41 चेंडूमध्ये 92 धावांचा पाऊस पाडला. रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी करत भारताची धावसंख्या वाढवली. रोहित शर्माच्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर भारताने सर्वात वेगवान 100 धावांचा पल्ला पार केला. भारताने फक्त 8.4 षटकात शतक फलकावर लागले होते. टी20 विश्वचषकातील सर्वात वेगवान 100 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाच्या एकाही गोलंदाजाला सोडले नाही, त्याच्यापुढे सर्व गोलंदाजी फिकी दिसून आली.
टीम इंडियाच्या 52 धावा झाल्या होत्या, तेव्हा रोहित शर्माने आपलं अर्धशतक पूर्ण केले होते. विराट कोहली दुसर्याच षटकात शून्यावर बाद झाला. त्यानंतरही रोहित शर्माची बॅट तळपळतच राहिली. रोहित शर्माने 41 चेंडूमध्ये 92 धावांचा पाऊस पाडला. रोहित शर्माने आपल्या वादळी खेळीमध्ये 8 षटकार आणि सात चौकार ठोकले. रोहित शर्माने स्टार्कच्या एकाच षटकात 4 षटकार ठोकत 29 धावा वसूल करत हवा काढली होती. रोहित शर्मापुढे ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले होते. रोहित शर्माचे शतक फक्त आठ धावांनी हुकले. पण रोहित शर्माने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
टी20 विश्वचषकात सर्वाधिक चौकार -
रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी फोडून काढत आणखी एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. टी20 विश्वचषकात सर्वाधिक चौकार ठोकण्याचा विक्रम आता रोहित शर्माच्या नावावर जमा झालाय. रोहित शर्माच्या आसपास विराट कोहलीही नाही.
सर्वात वेगवान अर्धशतक -
रोहित शर्माने 2024 टी20 विश्वचषकात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम अमेरिकेच्या अॅरोन जोन्स याच्या नावावर होता. रोहित शर्माने फक्त 19 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकले. हे टी20 विश्वचषक 2024 मधील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले.
2024 टी20 विश्वचषकातील सर्वात वेगवान अर्धशतक
रोहित शर्मा - 19 चेंडू
अॅरोन जोन्स - 22 चेंडू
क्विंटन डी कॉक - 22 चेंडू
मार्कस स्टॉयनिस - 25 चेंडू
शाय होप - 26 चेंडू
टी20 क्रिकेटमध्ये 200 षटकार -
हिटमॅन रोहित शर्माने टी20 क्रिकेटमध्ये मोठा माईलस्टोन पार केला. टी20 क्रिकेटमध्ये 200 षटकारांचा पल्ला पार कऱणारा रोहित शर्मा पहिला फलंदाज ठरलाय. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ख्रिस गेलच्या नावावर 174 षटकारांची नोंद आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19 हजार धावा -
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19 हजार धावांचा पल्ला पार केला. यामध्ये वनडे, टी20 आणि कसोटीचा समावेश आहे. रोहित शर्माने टी20 विश्वचषकात शानदार फटकेबाजी करत 19 हजार धावांचा पल्ला पार केला. रोहित शर्माआधी भारताकडून विराट कोहली, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांनी 19 हजार धावांचा पल्ला पार केला आहे.