IND Legends Vs SA Legends : इंडिया लिजेंन्ड्सच्या वतीनं खेळताना युवराज सिंगने पुन्हा एकदा सहा षटकार मारण्याची किमया केली आहे. यावेळी त्याने आठ चेंडूत सहा षटकार मारले आहेत. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिका लिजेन्ड्स संघाविरोधात खेळताना युवराज सिंगने 22 चेंडूत 52 धावांची शानदार खेळी खेळली आहे. युवराजच्या या खेळीमुळे इंडिया लिजेन्ड्सने दक्षिण आफ्रिकासमोर 205 धावांचं लक्ष ठेवलं.


युवराज सिंहने 18 व्या षटकात ब्रॉडच्या गोलंदाजीवर चार षटकार मारले आणि आपल्या एकाच सहा चेंडूतील सहा षटकाराची आठवण करुन दिली. युवराजने केवळ 22 चेंडूत 52 धावा केल्या. त्यामध्ये सहा षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे. या आधी त्याने इंग्लंडविरोधात सहा चेंडूत सहा षटकार मारले होते.


Road Safety World Series 2021 : सचिन-सेहवाग जोडीची पुन्हा फटकेबाजी, India Legends चा धमाकेदार विजय


सचिननेही या सामन्यात कमालीची खेळी केली. क्रिकेटच्या मैदानात ज्या शॉट्ससाठी सचिन ओळखला जातो, असेच काहीसे शॉट्स या सामन्याच्या निमित्तानं क्रीडारसिकांना पाहता आलं. अवघ्या 30 चेंडूंमध्ये सचिननं अर्धशतकी खेळी पूर्ण केली. तर, एकूण 37 चेंडूंमध्ये त्यानं 60 धावा केल्या.  


सचिनची ही तुफानी कामगिरी पाहून समालोचकांचा उत्साहसुद्धा गगनात मावेनासा झाला होता. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूचा तोच गाजलेला फॉर्म पुन्हा पाहायला मिळाल्यामुळं देव कधीच संन्यास घेत नसतो अशा शब्दांत समालोचकांनी सचिनची प्रशंसा केली. दक्षिण आफ्रिका संघातील जोडेंकीनं 13 व्या षटकात सचिनला झेलबाद केलं. यापूर्वी त्यानं बद्रीनाथसह मैदानात 95 धावांची भागिदारी केली होती. 


 


India Legends vs England Legends : सामना हरलो पण मनं जिंकली, इरफान, गोनीची धडाकेबाजी खेळी