Road Safety World Series 2021 : सचिन-सेहवाग जोडीची पुन्हा फटकेबाजी, India Legends चा धमाकेदार विजय
टीम इंडियाची आजवरची सर्वोत्तम सलामीवीर जोडी विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर काल पुन्हा एकदा मैदानात दिसली. Road Safety World Series 2021 मध्ये इंडिया लीजेंड्स (India Legends) विरुद्ध बांग्लादेश लेजेंड्स (Bangladesh Legends) यांच्यात झालेल्या सामन्यात या दोघांनी जोरदार फटकेबाजी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसचिन आणि सेहवागच्या धमाकेदार खेळीने त्यांनी हा सामना सहज खिशात टाकला. दोन्ही सलामीचे फलंदाज शेवटपर्यंत नाबाद राहिले. यावेळी दोघांनी जोरदार फलंदाजी केली. क्रिकेट प्रेमींना या सामन्यात चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली.
छत्तीसगडमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वर इंडिया लीजेंड्स (India Legends) विरुद्ध बांग्लादेश लेजेंड्सचा (Bangladesh Legends) पहिला सामना झाला.
इंडिया लीजेंड्सने 10.1 षटकांत 114 धावा करून हा सामना जिंकला. सचिन आणि वीरेंद्र सेहवाग शेवटपर्यंत नाबाद राहिले.
वीरेंद्र सेहवागसह (Virender Sehwag) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) हा सामना सहज जिंकला. सचिनने 26 चेंडूत 33 नाबाद धावा केल्या. या दरम्यान त्याने 5 चौकार ठोकले.
छत्तीसडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या हस्ते Road Safety World Series 2021 चा शुभारंभ करण्यात आला. या मालिकेत भारत, बांग्लादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचे खेळाडू सहभागी झाले आहेत.
वीरेंद्र सेहवागने 35 चेंडूंत 80 नाबाद धावा फटकावल्या. या दरम्यान त्याने 10 चौकार आणि 5 षटकार लगावले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -