Rishabh Pant-Nathan Lyon Viral Video : आयपीएल 2025 चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबरला होणार आहे, ज्याची सर्वत्र चर्चा आहे. केवळ चाहते आणि फ्रँचायझीच नाही तर खेळाडूही याबद्दल खूप उत्सुक आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यादरम्यान नॅथन लियॉन आणि ऋषभ पंत देखील आयपीएल लिलावाबद्दल बोलताना दिसले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दोघांमध्ये काय होते ते आम्ही तुम्हाला सांगतो.
ऋषभ पंतचा व्हिडिओ व्हायरल
यंदाचा लिलाव खूप खास असणार आहे, कारण त्यात ऋषभ पंत, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर सारखे 12 दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहेत. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पर्थ कसोटी सामन्यादरम्यान कांगारू फिरकीपटू आणि ऋषभ पंत यांच्यातील लिलावाबाबत चर्चा झाली.
नॅथन लियॉनने पंतला विचारले- मेगा ऑक्शनमध्ये कोणात्या संघात जाणार आहे? मात्र, उत्तर देताना पंत म्हणाला, मला नाही माहित. या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ऋषभ पंतवर पडणार पैंशाचा पाऊस
ऋषभ पंतने आयपीएल 2025 मेगा लिलावात 2 कोटी रुपयांच्या मूळ किंमतीवर त्याचे नाव ठेवले आहे. पण या खेळाडूला 25 ते 30 कोटी रुपये मिळाले तर कोणालाच नवल वाटणार नाही. होय, पंत हा लिलावात सर्वाधिक मागणी असलेला खेळाडू आहे. त्याला विकत घेणाऱ्या संघाला स्फोटक फलंदाज, भडक यष्टीरक्षक आणि कर्णधारपदाचा पर्यायही मिळेल. त्यामुळे कोणताही संघ या खेळाडूला विकत घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसेल.
IPL 2025 मेगा लिलावाची वेळ बदलली
एकीकडे 24 आणि 25 नोव्हेंबरला लिलाव होणार आहे. त्याचवेळी, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून म्हणजेच 22 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. आता 24 आणि 25 नोव्हेंबरला होणाऱ्या लिलावाची वेळ आणि पर्थ टेस्ट मॅचमध्ये वेळ सेम होती. या कारणास्तव आयपीएल 2025 मेगा लिलावाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता लिलाव दुपारी 3 वाजता नाही तर 3.30 वाजता सुरू होईल.
हे ही वाचा -
Video : तब्बल 9 महिन्यांनी भेटली संधी, 23 चेंडू खेळले पण पाटी कोरीच; देवदत्तला देव तारणार का?