MS Dhoni Record : महेंद्र सिंह धोनीने (MS Dhoni) निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियाला (Team india) त्याच्या सारखा धाकड यष्टीरक्षक फलंदाज मिळेल का? असा सर्वांसमोर प्रश्न होता. कारण एखाद्या दिग्गज खेळाडूची जागा घेणं कधीच सोपं नसतं. पण भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतने (Rishabh Pant) ही जागा योग्यरित्या घेत तिन्ही फॉर्मेटमध्ये उत्तम कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. त्याने धोनीचे काही रेकॉर्ड आताच तोडले असून काही रेकॉर्ड्सच्या हळूहळू जवळ जात आहे. यातीलच एक रेकॉर्ड म्हणजे यष्टीरक्षक फलंदाज म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा...

ऋषभने नुकताच श्रीलंका संघाविरुद्ध पार पडलेल्या कसोटी मालिकेत 'प्लेयर ऑफ द सीरीज' चा खिताब पटकावला. त्याने मालिकेत उत्तम कामगिरी केली होती. त्यामुळे एक खास रेकॉर्डही यावेळी त्याच्या नावावर झाला. कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत पंत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्टार माजी खेळाडू अॅडम गिलख्रिस्ट टॉपवर आहे. तर महेंद्र सिंह धोनी दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान पंतला धोनीचा रेकॉर्ड मोडण्यासाठी आणखी 34 षटकारांची गरज आहे. तर यादीत पहिल्या स्थानावर पोहचण्यासाठी पंतला आणखी 57 षटकारांची गरज आहे.  

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे यष्टीरक्षक

खेळाडू षटकार
अॅडम गिलख्रिस्ट 100
महेंद्र सिंह धोनी 78
ब्रॅड हेडिन 54
ऋषभ पंत 44

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha