IND vs ENG 3rd ODI 1st Innings Highlights: हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या संघानं गुडघे टेकले. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या संपूर्ण संघ 45.5 षटकात 259 धावांवर ढेपाळला. इंग्लंडकडून जोस बटलरनं (60 धावा) एकाकी झुंज दिली.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 45.5 षटकांत 259 धावांवर सर्वबाद झाला. भारताला एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी आजच्या सामन्यात 260 धावा कराव्या लागतील. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरनं सर्वाधिक 60 धावा केल्या. बटलरशिवाय जेसन रॉयनं 41 धावा, मोईन अलीनं 34 धावा , क्रेग ओव्हरटननं 32 धावा केल्या. तसेच बेन स्टोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोननं प्रत्येकी 27-27 धावांचं योगदान दिलं. भारताकडून हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करत 7 षटकात 24 धावा देत 4 विकेट्स घेतले. हार्दिकच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ही सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. त्यांच्याशिवाय युझवेंद्र चहलनं तीन आणि मोहम्मद सिराजनं दोन तर रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली.
संघ-
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज.
इंग्लंडचा संघ:
जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, जो रूट, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, डेव्हिड विली, ब्रायडन कार्स, रीस टॉपली, क्रेग ओव्हरटन.
हे देखील वाचा-